संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्थेकडून आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन लाखांचा धनादेश देऊन तो न वटल्याने संस्थेने दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात गुन्हा शाबीत झाल्याने कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जे.एम.पांचाळ यांनी आरोपी गंगाधर यशवंत निखाडे यांना तीन महिने कारावास व संस्थेस ३ लाख वीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिल्याने नाठाळ कर्जदारांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव अतिरिक्त मुख्य न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यावर नूतच निकाल जाहीर केला असून त्यात त्यांनी आरोपी गंगाधर निखाडे यांना तीन महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.शिवाय फिर्यादी संस्थेला तीन लाख २० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.या शिवाय नुकसान भरपाई देण्यात हयगय केल्यास आणखी सात दिवसाचा कारावास देण्याचे फर्मान काढले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी कोपरगाव शहरात अड्.रवींद्र बोरावके यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे.या संस्थेतून कोपरगाव येथील कर्जदार गंगाधर निखाडे यांनी आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी या संस्थेकडून कर्ज घेतले होते.व या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी आपला तीन लाखांचा धनादेश या संस्थेस दिला होता.मात्र संस्थेने तो धनादेश आपल्या खात्यात भरला असता.तो खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने तो वटला नव्हता.त्यामुळे संस्थेने कर्जदारा विरोधात कोपरगाव येथील न्यायालयात रीतसर एस.सी.सी.२९१/२०१७ अन्वये गुन्हा दाखल केला होता.यात न्यायालयाने चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले होते.व या खटल्यात गुन्हा शाबीत झाल्याची माहिती संस्थेचे वकील अड्.एस.डी. काटकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यावर नूतच निकाल जाहीर केला असून त्यात त्यांनी आरोपी गंगाधर निखाडे यांना तीन महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.शिवाय फिर्यादी संस्थेला तीन लाख २० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.या शिवाय नुकसान भरपाई देण्यात हयगय केल्यास आणखी सात दिवसाचा कारावास देण्याचे फर्मान काढले आहे.या खटल्यात ज्योती सहकारी पतसंस्थेच्या वतीने अड्.एस.डी. काटकर यांनी काम पाहिले. या आदेशाने संस्थेचे कर्ज घेऊन ते न देण्याऱ्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Leave a Reply