संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहारातील कापड बाजारातील रहिवासी आयुर्वेदिक औषध क्षेत्रातील तज्ज्ञ हेमंत चव्हाण यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पलता अंबादास चव्हाण (वय-८८) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने कोपरगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.ग.भा.पुष्पलता चव्हाण या कापड बाजार परिसरात अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या महिला म्हणून प्रसिद्ध होत्या.त्या हस्तकला,शिवणकला, साखर भांड्याचे नक्षीकाम आदींच्या कलेत प्रसिद्ध होत्या.या खेरीज भाजलेल्या व्यक्तीवर त्यांनी स्वतः बनवलेल्या मलमाने अनेक वर्ष त्यांनी मोफत उपचार करून त्यांनी रुग्णांची सेवा केली होती.गेले दोन वर्ष त्या अंथूरणाला खिळून होत्या.त्यांची ५ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेच्या सुमारास अखेर प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाने माजी मंत्री शंकरराव कोल्हे, राष्ट्रीय आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.रामदास आव्हाड,कोपरगाव नगरपरिषद अध्यक्ष विजय वहाडणे,आदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.त्यांच्यावर कोपरगाव स्मशानभूमीत गोदावरीतीरी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी मोठ्या संख्येने कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.त्या पुणे येथील डॉ.शशिकांत चव्हाण यांच्या मातोश्री होत्या.
Leave a Reply