संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सावित्रीबाई फुले यांनी परंपरेची चौकट मोडून समाज अधोगतीचे मूळ उध्वस्त करून शिक्षणाचा मंत्र दिल्याने सावित्रीच्या लेकींना संकटकाळात धाडसाने सामोरे जाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महिला फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
अॅड.मनोहर येवले यांनी ‘स्त्री विषयक कायदे’ या विषयावर शारीरिक, लैगिक, मानसिक, भावनिक व आर्थिक त्रासाबद्दलचे अनेक उदाहरणे सांगून युवतींनी धाडसी होण्यासाठी कायद्याचा आधार घेण्याचे आवाहन केले. दुपारच्या सत्रात प्रा.संजय धोपावकर यांनी युवतींना स्वसंरक्षणाचे प्रात्याक्षिके करून दाखविली, त्याचबरोबर स्वतः विकसित होण्यासाठी गरुडझेप घेण्याची क्षमता अवगत करण्याचे आवाहन केले.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय निर्भय कन्या अभियान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. थोपटे हे होते.
सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. रमेश झरेकर, प्रा.डॉ.रामदास पवार व सुशीलाबाई काळे महाविद्यालय, गौतमनगर, प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी संचलीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,पुणतांबा, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग व संजीवनी कॉलेज ऑफ फार्मा. सहजानंदनगर येथील विद्यार्थिनी,शिक्षक बहू संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे यांनी युवतींनी निर्भय होण्यासाठी सक्षम बनणे व योग्य वेळी सक्रियता दाखविली तरच प्रश्न सोडविता येतात असा आत्मविश्वास व्यक्त केला.
सदर प्रसंगी कार्यशाळेतील प्रमुख वक्ते अॅड्. मनोहर येवले, प्रेमराज सारडा महाविद्यालय,अहमदनगरचे क्रीडा संचालक प्रा.संजय धोपावकर, पारनेर कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.संजय गायकवाड आणि क्रीडा शिक्षक व मास्टर ट्रेनर प्रा.सुनिल मोहिते आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाचे चेअरमन डॉ.गणेश विधाटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.दीपिका चव्हाण,प्रा.डॉ.प्रतिभा रांधवणे व प्रा.डॉ.विजय निकम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.प्रकाश सावंत व डॉ.योगिता भिलोरे यांनी केले.आभार प्रा.डॉ.राजाराम कानडे यांनी मानले.
Leave a Reply