संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस नगर-मनमाड रस्त्यावर टाकळी फाट्यानजीक रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उभ्या आयशरची काच फोडून आत प्रवेश करून मध्यप्रदेश मधील खाचरोद येथील गाडीच्या क्लीनर लाखनसिंग जगदीश परमार (वय-२८) यांना मारहाण करण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारून चार दरोडेखोरांनी धूम ठोकल्याने वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,मध्यप्रदेश येथील खाचरोद ता.बदनावर जि. धार येथील आयशर ट्रॅकचे चालक व क्लिनर हे आपला ट्रक मध्यप्रदेश मधील पिथमपूर येथून काही माल आपल्या ट्रकमध्ये घेऊन तो पोहचविण्यासाठी आंध्रप्रदेशात मदानापूर येथे जात असताना त्यांची गाडी कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्यानाजीक येसगाव ग्रामपंचायत हद्दीत बंद पडली असताना रविवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास काळ्या रंगाची काळी बजाज पल्सर व त्याच रंगाची विनाक्रमांकाची होंडा शाईन मोटारसायकलवर २५ ते ३५ वयोगटातील आरोपी हे तिथे आले व त्यांनी क्लिनरच्या बाजूची काच फोडून त्यांच्या गाडीत प्रवेश करून त्यांना शस्राचा धाक धाखवून त्यांच्याकडील ५०० रुपये किंमतीच्या ६० नोटा व हनार कंपनीचा ३ हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल फोन असा ३३ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.या प्रकरणी गाडीचा क्लिनर व मालक असलेले लाखनसिंग परमार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.३५/२०२० भा.द.वि.कलम ३९४,४२७,५०६,३४ प्रमाणे अज्ञात चार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.
Leave a Reply