संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या दक्षिणेस साधारण दोन कि.मी.अंतरावर जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पुणतांबा चौफुलीवर गुरुवारी दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास समता स्कूलच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने (क्रं.माहिती नाही) दुचाकीस (क्रं.एम.एच,१७ बी.आर. १०१४ )दिलेल्या धडकेत बाभळेश्वर राजवाडा ता.राहाता येथील दुचाकीवर मागे बसलेली महिला सुमन साहेबराव कदम (वय-४५) हि महिला जागीच ठार झाली आहे.तर त्यांचा मुलगा योगेश साहेबराव कदम (वय-२२) हा गंभीर रित्या जखमी झाला असल्याची खात्रीलायक बातमी असून या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात बस चालकाविरुद्ध रंगनाथ दशरथ धिवर रा.कोकमठाण यांनी गुन्हा दाखल केला आहे.बस चालक अपघातानंतर आपल्या ताब्यातील बस घेऊन पसार झाला आहे.
मयत महिला सुमन कदम या आपल्या मुलाला घेऊन आपल्याच दुचाकीवरून भेटण्यासाठी येत होत्या.काही नातेवाईक राहत असून ते काही कामासाठी बाभळेश्वर येथून सकाळी साडेदहा च्या सुमारास वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून कोपरगावकडे येत असताना पुणतांबा चौफुलीवर पूणतांब्याकडून समता स्कुलची बस भरधाव वेगाने येत होती. तिने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आमच्या दुचाकीस जोराची धडक देऊन त्यात सुमन कदम यांच्या डोक्यावरूनचं गाडीचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव शहराचे उपनगर खडकी येथे मयत महिला सुमन कदम या आपल्या मुलाला घेऊन आपल्याच दुचाकीवरून भेटण्यासाठी येत होत्या.काही नातेवाईक राहत असून ते काही कामासाठी बाभळेश्वर येथून सकाळी साडेदहा च्या सुमारास वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून कोपरगावकडे येत असताना पुणतांबा चौफुलीवर पूणतांब्याकडून समता स्कुलची बस भरधाव वेगाने येत होती. तिने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आमच्या दुचाकीस जोराची धडक देऊन त्यात सुमन कदम यांच्या डोक्यावरूनचं गाडीचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या आहेत.तर त्यांचा मुलगा योगेश कदम हा गंभीर जखमी झाला आहे.या घटनेनंतर त्याठिकाणी जखमी तरुणांचा मामेभाऊ रंगनाथ दशरथ धिवर (वय-३५ ) हे जात असताना त्यांना पुणतांबा चौफुलीवर गर्दी आढळून आली. त्यांनी आपली गाडी थांबवून काय झाले म्हणून तेथे गेले असता त्यांना आपला आतेभाऊ जखमी अवस्थेत तर त्याची आई मयत स्थितीत आढळून आली. त्यांनी लागलीच उपचारासाठी रुग्णवाहिकेसाठी फोन करून बोलावून घेतली व जखमींना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिला सुमन कदम यांना मृत घोषित केले आहे.
या घटने नंतर रंगनाथ धिवर यांनी समता स्कूलची बस व त्यावरील अज्ञात चालक यांच्या विरुद्ध भा.द.वि.कलम ३०४(अ)२७९,३३७,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,/१७७,प्रमाणे बसचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.
Leave a Reply