संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धारण गाव ग्रामपंचायत हद्दीत कुंभारीकडून कोपरगावकडे येत असणाऱ्या बजाज प्लॅटिना (क्रं. एम.एच. १७ ए. आर.७७०५) या दुचाकीस मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने (क्रं.एम.एच.१७ ए. जी. ५०३१) जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार विजय चंदू मोहरे (वय-४५) हे गंभीर रित्या जखमी होऊन त्यांना कोकमठाण येथील आत्मा मलिक रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मंगळवार दि.२८ जानेवारी रोजी मालवली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोपरगाव-कोळपेवाडी हा रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्यापासून या रस्त्यावर वहाने भरधाव वेगाने धावत आहेत.त्यातून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे अनेक पुरावे मिळत आहे.शनिवार दि. २५ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुचाकी चालक मयत विजय चंदू मोहरे हे आपल्या वरील क्रमांकाच्या बजाज प्लॅटिना या दुचाकीवरून कुंभारी कडून कोपरगाव कडे येत असताना त्यांना मागील बाजूने वरील क्रमांकाच्या टेम्पोने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील टेम्पो चालवून दुचाकीस्वार विजय मोहरे यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत.अपघातांनातर टेम्पोचालक फरार झाला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालक याचे विरुद्ध गु.र.नं. ३२/२०२०,भा.द.वि. कलम ३०४( )२७९,१८४ अन्वये अज्ञात टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अशोक आंधळे हे करीत आहेत.
Leave a Reply