संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील आपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रेखा संतोष गव्हाळे व त्यांचे पती संतोष गव्हाळे हे आपल्या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१७ सी.ए.४८४७) कोपरगावकडून आपल्या घराकडे जात असताना आरोपी आपेगाव रस्त्यावर आरोपी दिलीप वेणूनाथ गव्हाळे,प्रमोद वेणूनाथ गव्हाळे,वेणूनाथ रंगनाथ गव्हाळे,अमोल जयवंत भुजाडे,सर्व रा.आपेगाव व रणजित मढवई रा.चिंचोडी ता.येवला यांनी मागील भांडणाच्या कारणावरून आमची दुचाकी अडवून आम्हाला लोखंडी कोयता,कुऱ्हाड, गज,आदी शस्र दाखवून शिवीगाळ दमदाटी करून आमचे पाठीमागे लागल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला असल्याने आपेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,फिर्यादी महिला रेखा गव्हाळे व आरोपी दिलीप गव्हाळे यांचे काही कारणावरून वाद असून त्यांच्या या वादाचे पर्यवसान नुकतेच वेगळ्या स्वरूपात झालेले पाहायला मिळाले असून फिर्यादी महिला व त्यांचे पती हे आपले काही काम करून कोपरगाव वरून आपल्या गावाकडे सोमवार दि.२७ जानेवारी रोजी आपल्या घराकडे परतत असताना त्यांची दुचाकी आपेगाव रस्त्याने आरोपी वेणूनाथ गव्हाळे यांचे घरासमोर आली असताना त्यांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांना शिवीगाळ केली व कोयता,गज,कुऱ्हाडीच्या साह्याने त्यांना धमकावले आहे.
त्यांनी या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी गु.र.नं.२६/२०२० भा.द.वि.कलम ३४१,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ आर्म ऍक्ट ४/२५ प्रमाणे वरील पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.
Leave a Reply