संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील खडकी या उपनगरातील एका चौतीस वर्षीय मतिमंद अविवाहित महिलेवर त्याच भागांतील आरोपी जालिंदर कचरू त्रिभुवन व नवनाथ उर्फ रवीशंकर मच्छीन्द्र वाघ यां दोघा नराधमांनी गुरुवार दि.३० जानेवारी रोजी दुपारी बारा व पावणे चारच्या सुमारास बलात्कार केला असल्याचा गुन्हा या मतिमंद महिलेच्या भावजईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव शहर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान जुलै २०१७ मध्ये कोपरगावात एका मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून कोपरगाव शहरात राजकीय फूस मिळून अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांनी मोठे मोर्चे काढून पोलिसांना धारेवर धरले होते व पुढे या प्रकरणाचे सत्य आमच्या प्रतिनिधीने सामोरे आणले होते त्यावेळी काही नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींच्या कार्यालयावर हल्ला चढवून सुमारे अडीच लाखांचे नुकसान केले होते.त्या नंतर या जवळपास १९ आरोपींवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर अद्याप खटला सुरु आहे.त्या नंतर अशी घटना अडीच वर्षांनी घडली आहे.या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत खडकी हे उपनगर वायव्येस सुमासे तीन कि.मी.अंतरावर असून या भागात जास्त करून श्रमिक वर्ग राहतो.त्याच भागात या मतिमंद महिलेचे कुटुंब राहात असून वडील रिक्षा चालक तर भाऊ गाडीचालक आहे.तर आई केटरिंगच्या व्यवसायात मजुरीला जात असते.तर फिर्यादी महिला व या मतिमंद महिलेची भावजय धुनिभांड्याचे काम करत असते.
फियादी महिला आपल्या कामास जाताना अत्याचारित मतिमंद महिलेस जेवण खाऊ घालुन तिचे सर्व सोपस्कार आवरून घाराशेजारीच असलेल्या शेळ्यांच्या शेडमध्ये बसवून घराला कुलूप लावून गेली होती.दुपारी पावणे चारच्या सुमारास त्या घरी आल्या असता त्यांना या शेळ्यांच्या शेडमध्ये आरोपी नवनाथ मच्छीन्द्र वाघ हा या मतिमंद महिलेशी आक्षेपार्ह स्थितीत आढळला.फिर्यादी महिलेने आरडाओरडा केला असता तो त्यांनतर तेथून पळून गेला.
गुरुवार दि.३० जानेवारीच्या दिवशी या अत्याचारित महिलेचे आई,वडील,भाऊ हे सकाळीच कामाला निघून गेले होते.व फियादी महिला आपल्या कामास जाताना अत्याचारित महिलेस जेवण खाऊ घालुन तिचे सर्व सोपस्कार आवरून घाराशेजारीच असलेल्या शेळ्यांच्या शेडमध्ये बसवून घराला कुलूप लावून गेली होती.दुपारी पावणे चारच्या सुमारास त्या घरी आल्या असता त्यांना या शेळ्यांच्या शेडमध्ये आरोपी नवनाथ मच्छीन्द्र वाघ हा या मतिमंद महिलेशी आक्षेपार्ह स्थितीत आढळला.फिर्यादी महिलेने आरडाओरडा केला असता तो त्यांनतर तेथून पळून गेला. या महिलेने त्या नंतर आपला पती,सासरा यांना या बाबत भ्रमंध्वनिवरून या बाबत घटनेचे गांभीर्य विशद करून तातडीने घरी बोलावून घेतले.ते घरी आले असता त्यांनी आरोपी नवनाथ वाघ यांचे घरी जाऊन त्याबाबत त्यास जाब विचारला असता त्याने,”मी तर आता गुन्हा केला पण दुपारी जालिंदर त्रिभुवन याने असेच कृत्य केले त्याचे तुम्ही काय उखडून घेतले ?” असा उर्मट सवाल केला असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी रात्री उशिरा ११.२० वाजता आरोपी जालिंदर कचरू त्रिभुवन व नवनाथ मच्छीन्द्र वाघ या दोघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.न.४१/२०२० भा.द.वि. कलम ३७६(२),(जे)(एल) या नुसार दोन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.घटनास्थळी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पुढील तपास करीत आहेत.
Leave a Reply