संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था टिकविणे आणि तिला अधिक बळकटी देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याचसाठी देशाच्या सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाचे महत्त्व असाधारण असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये दहावा राष्ट्रीय मतदार दिन झाला मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
यानिमित्ताने शालेय स्तरावर निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यातील बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना तहसिलदार योगेश चंद्रे यांनी प्रमाणपत्र व पेन भेट देवून गौरव केला.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,प्रत्येक पात्र मतदारांनी त्यांची मतदारनोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय निवडणुकीत मतदानाचा हक्क आवर्जून बजावला पाहिजे. जागरुक मतदार हे प्रगत लोकशाहीचे द्योतक मानले जाते. राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजे मतदानाचा अधिकार मिळाल्याचा उत्सव असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेचा बीएलओ, एनजीओ कणा असल्याचेही ते शेवटी म्हणाले.
या स्पर्धेचा निकाल – तालुकास्तरीय निबंध स्पर्धा गट- १(पाचवी ते सातवी) प्रथम क्रमांक- संस्कृती जालिंदर चव्हाण,(सोमय्या विद्यामंदिर), द्वितीय क्रमांक-सृष्टी संतोष देशमुख,(श्री वीरभद्र विद्यालय दहेगाव),तृतीय क्रमांक-प्रियांका श्रीहरी नागरे (द.ति.पाटील विद्यालय चासनळी), गट क्रमांक-२(आठवी ते दहावी) प्रथम क्रमांक- धनश्री मनुलाल गांगुर्डे (श्री वीरभद्र विद्यालय,दहेगाव) द्वितीय क्रमांक- कोमल भिकाजी झिंजुर्डे (जय हनुमान विद्यालय रांजणगाव),तृतीय क्रमांक- साक्षी प्रफुल वराडे (न्यू इंग्लिश स्कूल धामोरी), गट क्रमांक-३ (अकरावी व बारावी) प्रथम क्रमांक-वनिता दत्तू चव्हाण(सोमय्या विद्यामंदिर), द्वितीय क्रमांक- शितल ज्ञानेश्वर कडू (सोमय्या विद्यामंदिर),तृतीय क्रमांक-गायत्री भीष्माचार्य जाधव (सोमय्या विद्यामंदिर),चित्रकला स्पर्धा गट क्रमांक-१ (पाचवी ते सातवी) प्रथम क्रमांक- प्रज्वल काकासाहेब आवरे (द.ति.पाटील विद्यालय चासनळी), द्वितीय क्रमांक- अनिकेत ज्ञानदेव झाल्टे(शिवशंकर विद्यालय रवंदे), तृतीय क्रमांक-समीक्षा राजेंद्र अरगडे (न्यू इंग्लिश स्कूल धामोरी) गट क्रमांक २ (आठवी ते दहावी) प्रथम क्रमांक-अमृता सुभाष टपाल (डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्या मंदिर),द्वितीय क्रमांक-मयुरी संजय मोरे (सोमय्या विद्यामंदिर),तृतीय क्रमांक-ऋतुजा राजेंद्र कदम (श्री वीरभद्र विद्यालय दहेगाव बोलका) गट क्रमांक-३ (अकरावी व बारावी) प्रथम क्रमांक- वाल्मीक संजय मोरे (सोमय्या विद्यामंदिर) द्वितीय क्रमांक- संकेत दादासाहेब थौरमिसे (सोमैया विद्यामंदिर) तृतीय क्रमांक- शुभम प्रभु पगारे (सोमय्या विद्यामंदिर) यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी जनजागृती फेरीचे आयोजित करण्यात आली.यात एस.जी.विद्यालय यांनी वाद्यपथकासह सहभाग घेतला.तसेच डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यालय,सेवा निकेतन यांनी जनजागृती फलकासह सहभाग घेतला.कोपरगांव शहरातून या फेरीचे आयोजन करण्यात आले. यात मुख्याध्यापक रमेश गवळी,प्रा.मंजुषा सुरवसे,प्रा.लिसी थिटील ,अतुल कोताडे, सुरेंद्र शिरसाळे, अनिल काले,कुलदीप गोसावी, राजश्री बोरावके, कल्पना महानुभव,कविता गवांदे,गावीत्रे सर,येवले सर,मेंढे सर,श्रीम.कुदळ,सौ.बी.एस.गागरे यांचे सह शाळेतील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.सुत्रसंचालन समन्वयक सुशांत घोडके यांनी तर गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे,सहाय्यक सोनवणे, निवडणूक शाखेचे अरुण रनणवरे यांनी संयोजन केले होते.
Leave a Reply