संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
समाजातील उपेक्षित, वंचित, दुर्बल घटकातील कुटुंबातील मुलांना मदतीचा हात देवून हि मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे त्यानी शिकून मोठ व्हावे हे कर्मवीर शंकरराव काळेचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार व्हावे यासाठी सुशीलामाईंनी त्यांना संसारात अनमोल साथ दिली त्यामुळे माजी खा.शंकरराव काळे यांना अनेक ठिकाणी शिक्षणाची मंदिरे उभी करता आली असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी उक्कडगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे व सुशीलामाईंनी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची दिलेली संधी वाया न घालवता या संधीचे सोनं करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील सुशीलामाई काळे माध्यमिक विद्यालयात सुशीलामाई काळे यांचा २१ स्मृतिदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे होते.
या वेळी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, जिल्हा परिषद सदस्य सोनाली साबळे, वाल्मिक निकम, पोपट भुजाडे, रामभाऊ खिलारी, सुदाम शिंदे, भाऊसाहेब निकम, आप्पासाहेब निकम, बबनराव गाडे, नानासाहेब निकम, पांडुरंग निकम, रामभाऊ निकम, मनसुब निकम, रमेश पोटे, शत्रुघ्न कराळे, राहूल जगधने, राजेंद्र भाकरे, माच्छिंद्र निकम,नवनाथ निकम, राजू पटेल, विठ्ठल निकम, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लावरे यांच्यासह उक्कडगाव व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर शंकररावजी काळे व सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, कर्मवीर काळे यांना शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांविषयी आपुलकी होती. त्यांनी स्थापन केलेल्या शाळा-महाविद्यालयातून शिक्षण घेवून गेलेले विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत असून त्यांनी शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या मुलांमध्ये पाहिलेलं स्वप्न माईंच्या त्यागातून पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी यावेळी आ. काळे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे मतदान करण्याची शपथ उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना दिली.
कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे व सुशीलामाईंनी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची दिलेली संधी वाया न घालवता या संधीचे सोनं करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन केले आहे. यावेळी उपस्थितांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक शिवाजी लावरे यांनी केले तर आभार शेळके यांनी मानले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अॅड.प्रमोद जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे होते.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक शिवाजी लावरे यांनी केले तर आभार शेळके यांनी मानले.
Leave a Reply