संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर रात्री साडे दहाच्या सुमारास रस्त्यावरील अवजड वाहनांना शस्राचा धाक वाहन चालकांना दाखवून लूटमार चालू असल्याची खबर मिळाल्यावरुन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या धाडसी कारवाईत आठ पैकी पाच दरोडेखोरांशी झटपट करून पोलिसांनी त्यांना जेरबंद केले असून तीन जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्याने या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान यातील पाच आरोपीना पकडल्यानंतर फिर्यादी अशोक अहिरे यास रात्री आदल्या दिवशी साडे नऊच्या सुमारास बहिणीच्या लग्नावून परतत असताना सुभाषनगर येथे संजय उशिरे यांच्या दुकानाजवळ लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा व जीवे मारण्याची धमकी देणारा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,घोटी मार्गे मुंबई-नागपूर हा महामार्ग अवजड वाहनधारकांना सर्वात जवळचा मार्ग ठरत असल्याने या महामार्गावर खड्यांच्या महापूर असतानाही वेळ व पैसा वाचविण्यासाठी दिवस व रात्र वाहानांची मोठी वर्दळ असते.मात्र रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त असल्याने या महामार्गावर लुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत.अनेक चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले असले तरी मात्र हा दरोड्यांचा “रात्रीचा खेळ” संपण्याचे नाव घेत नाही.बुधवार दि.२२ जानेवारीच्या रात्री सडे दहाच्या सुमारास एका व्यक्तीचा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दूरध्वनी आला व त्याने ठाणे अंमलदार यांना सांगितले कि,संवत्सर -कोकमठाण या गावांच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावर गोदावरी पुलाजवळ काही व्यक्ती अवजड वाहनधारकांना अडवून त्यांना शास्राचा धाक दाखवून अडवून त्यांची लूट करीत आहेत.त्याची अधिकाऱ्यांनी खातरजमा करत घटनास्थळाकडे धाव घेतली व त्या ठिकाणी गोदावरी पुलाचे अलीकडे थांबून आपली जीप रस्त्याचे बाजूला उभी करुन घटनास्थळाकडे जात असताना काही इसम घटनास्थळावरून आरडाओरडा करत पळून जाताना दिसले कोपरगाव पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यातील पाच जणांना पकडण्यात यश मिळवले त्यावेळी काहींनी झटपट करून पळून जाण्याचा प्रयत्न करून पहिला मात्र त्यांना यश मिळाले नाही त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना पकडून आणले असून त्यांची नावे नाजीम इस्लाउद्दीन शेख,(वय-२३)रा.गांधीनगर,कोपरगाव.राहुल शिवाजी शिदोरी,(वय-२१)रा.गोकुळनगरी,दत्तू शांताराम साबळे,(वय-२५) रा.जुना टाकळी नाका, इम्रान अन्वर पठाण,(वय-१८) रा.टाकळी, सागर तान्हाजी विसपुते,(वय-२६) रा.सुभाषनगर,विजय आरक रा.सुभाष नगर, (फरार),चेतन शिरसाठ रा.निवारा,(फरार),गोट्या पूर्ण नाव माहित नाही.(फरार) सर्व रा.कोपरगाव जि. अहमदनगर आदी आठ आरोपी यात निष्पन्न झाले आहेत.पैकी पाच आरोपीना पोलिसांनी गजाआड केले आहे.
या धाडसी कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल आर.पी.पुंड, जयदीप गवारे, अंबादास वाघ, रामकृष्ण खारतोडे, अनिस शेख, पद्मकुमार जाधव,सोमनाथ राऊत,आदींनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
त्यांच्याकडून तीन दुचाकी सह तलवारी,चालू,भ्रमणध्वनी,कटावणी,लाकडी स्टंप,लोखंडी पाईप असा एक लाख ४५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.
Leave a Reply