संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रत्येक पुरूषाने स्त्रीचा सन्मान केला पाहिजे ही शिकवण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना देण्याची गरज असून हे संस्कार शालेय जीवणात रूजवले जात असल्याचा प्रत्यय आज आपल्याला आला असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या संचालीका स्नेहलता शिंदे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
या वेळी औरंगाबादचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद जगताप म्हणाले की, विदयार्थी संस्कारीत करणे व त्यांना सक्षम करणे हा विदयालयाचा उददेश असल्याने या ठिकाणी निश्चितच चांगले विद्यार्थी घडतील. चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांवर बिंबवणे हे महत्वाचे कार्य हे विद्यालय गेल्या एकवीस वर्षापासुन अविरत करत आहे असे गौरवोदगार त्यांनी शेवटी काढले आहे.
कोपरगाव शहरानजीक असलेल्या संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलचे २२ व्या स्नेहसंमेलन नुकतेच आयोजित केले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण हे होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी अमेरिका येथील उदयोजक अनिलराव शिंदे,औरंगाबादचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्ष प्रमोद जगताप,संस्थेचे विश्वस्त अंबादास अंत्रे,रामकॄष्ण कोकाटे,बाळासाहेब चव्हाण,विलास कोते,शाळेचे प्राचार्य राजेंद्र पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, छोटया छोटया गोष्टीतुन पण आनंद घेता आला पाहिजे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर योग्य संस्कार केले तर निश्चितच सक्षम पीढी निर्माण होर्इल.
सदर कार्यकमाच्या प्रंसगी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका जयश्री दरेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनिल भागवत , स्वप्नील पाटील , शादमीन सय्यद , जयप्रकाश पांडे,संतोष चव्हाण, सुरज तुवर, विजय कोल्हे , वनिता औताडे , रूपाली काशिद , कला शिक्षक महेश शिंदे , इम्रान शेख , किशोर भोसले यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply