संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील अत्तार कॉलनीत क्रिकेटच्या मैदानात कार लावून क्रिकेटचे मैदान खराब केल्याच्या कारणावरून आरोपी सुभाष नगर येथील आरोपी विकी दुनबळे याने आज दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास फायटरच्या सहाय्याने केलेल्या मारहाणीत फिर्यादी इम्तियाज रियाज शेख (वय-२४) हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव येथील उपनगर असलेले सुभाषनगर येथे काही तरुणांनी क्रिकेटसाठी मैदान तयार केले होते मात्र फिर्यादी तरुण इम्तियाज शेख यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी आपली कार थेट त्या तयार केलेल्या मैदानात नेल्याने ते मैदान खराब केल्याचा आरोपी तरुण विकी दुनबळे यास राग आला व त्याने फिर्यादी इम्तियाज शेख यास त्याबाबतचा जाब विचारला त्यात बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.या प्रकरणी फिर्यादी तरुण शेख याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.१३/२०२०भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.
Leave a Reply