संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शालेय जिवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर विविध खेळाचां सराव करणे व्यायाम केल्याने शरीर तंदुरूस्त रहात असून जीवनात वक्तशिरपणा शिस्त व सरावातील सातत्य हे गुण असले कि जीवनात यश निश्चीत मिळत असल्याचे प्रतिपादन अस्थीरोगतज्ञ डाॅ. प्रितम जपे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले आहे.
कोपरगाव नजीक असलेल्या संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल येथे बाविसाव्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन उद्योजक रविंद्र आढाव तसेच संस्थेचे विश्वस्त अंबादास अंत्रे,बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका सौ. जे. के. दरेकर आदी मान्यवर उपस्थीत होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “खेळामध्ये हार-जीत होतच असते पण यशाने हुरळुन जाऊ नये व अपयशाने खचू नये शालेय जीवन हे परत येत नाही त्यामुळे त्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घ्यावा. विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या यशस्वी खेळाडुचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वनील पाटील, सुरज तुवर व एस. एम. सय्यद यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ. ए. व्ही वरकड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख शिवप्रसाद घोडके,योगेश बिडवे, गणेश वाकचौरे, प्रिया बोधक आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply