संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरवर्षी १४ डिसेंबर हा “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन ” तर १४ डिसेंबर ते २० डिसेंबर हा “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह “म्हणून साजरा केला जातो. सर्व स्तरावरील उपभोक्त्यांना ऊर्जा बचतीचे महत्व अवगत करून देवून दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर अत्यावश्यक वेळीच केला जावा या प्रमूख उद्देशामुळेच या संवर्धन दिनाचे आणि सप्ताहाचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रामध्ये ऊर्जा संवर्धनाचा वाव आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे महत्व पाहता केंद्र शासनाने ऊर्जा संवर्धन कायदा २००१ पारित केला आहे.
या कायद्याच्या माध्यमातून ऊर्जा वापर कमी होण्यासाठी विविध योजना तयार करण्याच्या अनेक तरतूदी आहेत. ऊर्जा संवर्धनाचा प्रचार आणि प्रसार करून “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे महत्व विविध घटकांना पटवून देणे हा ही या कायद्याचा आणखी एक प्रमुख भाग असून महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (महाउर्जा) अभियानांतर्गत कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते सोपानराव देवकर हे होते.
या कार्यक्रम प्रसंगी भागवत देवकर,उत्तमराव देवकर,कोपरगाव पालिकेचे माजी नगरसेवक दिनार कुदळे,सरपंच संदिप देवकर, शेतकरी संघाचे जेष्ट संचालक अंबादास पा देवकर,चंद्रकांत देवकर,अनिल चव्हाण,रामदास देवकर,राजेंद्र देवकर, पोलिस पाटील मनेश देवकर, अध्यक्ष साई फार्मस कल्बचे अध्यक्ष मनीष देवकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राचाच विचार केला तर दरवर्षी ५५ दशलक्ष मेट्रिक टन इतका कोळसा वीज निर्मिती साठी जाळला जातो यातुन २६ दशलक्ष मेट्रिक टन राख निर्माण होते किरणोस्सारीत टाकाऊ पदार्थ धूर राख व धुळीचे कण हे वातावरणात सोडल्या मुळे जमीन, पाणी व हवेचे खूप मोठ्या प्रमाणात दूषित होऊन ग्रीन हाऊस गँसेस व कार्बन कणांचे प्रमाण भरमसाठ वाढत आहे त्या मुळे जगाला नैसर्गिक अपत्तीला सामोरे जावे लागते हे संकट भंयकर आहे यातुन सुटका करण्याचा प्रमुख मार्ग सौरऊर्जा व पवनऊर्जा वापरणे गरजेचे आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,”पारंपरिक पध्दतीने ऊर्जा निर्मिती केंद्राची उभारणी करताना फार मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो कोळसा,तेल,गँस आदिंचा मोठा अपव्यय होतो त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. पाण्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी मोठमोठी धरणे बांधून पाण्याची साठवणूक करुन वीज निर्मिती करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागतो मात्र सौर ऊर्जा व पवनऊर्जा ला उभारणी खर्चानतंर दररोज सूर्याच्या उष्णतेसाठी व हवेसाठी कोणताही कच्चा माला व पाणी खर्च करण्याची गरज पडत नाही त्यामुळे पर्यावराणाचा समतोल व खर्चातही खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते आपल्या महाराष्ट्रात सौरकिरण क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.जनतेच्या संवादातून व लोक सहभागातून आपल्या महाराष्ट्रात आपण हागणदारी मुक्त योजना,नि्र्मलग्राम योजना,तंटामुक्ती योजना व वीज बचतीची अक्षय प्रकाश योजना यशस्वी पणे राबविण्यात येत असल्याचे सांगून महाउर्जाची ऊर्जा संवर्धन, सौरऊर्जा वापर व प्रचार यादीत सुध्दा यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर यांनी केले त्यात त्यांनी कोपरगाव तालुक्यात प्रथम आमच्या टाकळी अक्षय प्रकाश आणि सौर ऊर्जे योजनेसाठी केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार अंबादास लक्ष्मण देवकर यांनी मानले.
Leave a Reply