भर रस्त्यात रिसिप्शन कार्यक्रम,पूर्ण कुटुंबावरच गुन्हा दाखल !

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील वास्तव चौक कोर्ट रोड येथे भर रस्त्यात पोलीस विभागाची परवानगी न घेता काल रात्री आठ वाजेच्या सुमारास आपले जवळचे नातेवाईकांना जमवून लग्नाचे रिसिप्शन साजरे करणाऱ्या कुटूंबाला हि बाब चांगलीच महाग पडली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नितीश अशोकराव बोरुडे,अतिष अशोकराव बोरुडे,सतीश अशोकराव बोरुडे, अशोकशेठ सिद्धूशेठ बोरुडे, स्नेहा अतीश बोरुडे,विक्रम बाळासाहेब मासाळ या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्त वर्तन करणाऱ्या प्रवृत्तीत चांगलीच खळबळ उडाली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं ९ सप्टेंबर २०१३ रोजी बेशिस्त फेरीवाल्यांबाबत आदेश दिला, त्या प्रमाणे फेरीवाल्यांच्या जागेबाबत सरकारने ४ मार्च २०१४ रोजी कायदाही मंजूर केला, त्यावर राष्ट्रपतींनीही सही केली. आम्ही सार्वजनिक ठिकाणी कसं बसावं, कशी दुकानं मांडावीत याची सर्व आखणी आम्हाला करून दिलेली आहे.त्या प्रमाणे सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग करणाऱ्यांवरही कारवाईसाठी सरकारने नियम बनवून द्यायला हवे आहेत.

सार्वजनिक जागा लोकांच्या हितासाठीच वापराव्यात. सरकारने बरेच नियम बनवले आहेत, पण त्या नियमांचं पालन कोणीच करत नाही. सगळेच जण आपल्या खासगी कामांसाठी सार्वजनिक जागेचा वापर करतात. यातलं साधं उदाहरण द्यायचं झालं तर सोसायटीचे कार्यक्रम. अशा अनेक सोसायट्या आणि विविध मंडळे आहेत ज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे रस्त्यावरच मंडप घालून केले जातात. गणेशोत्सव मंडपांच्या बाबतीत काही वेगळी परिस्थिती नाही. रस्त्यावर येऊन आपला उत्सव साजरा करण्याची काय गरज ? जिथे तिथे मंडप बांधले जातात. धर्माच्या नावाखाली कुठेही मंडप बांधणं चुकीचं आहे. मंडप बांधायलाच सरकारने परवानगी देऊ नये. यासंदर्भात काही नियम असतील पण त्यांचं काटेकोर पालनही केलं पाहिजे. नियम बनवले म्हणजे सरकारची जबाबदारी संपली असं होत नाही. तसंच सरकारबरोबर नागरिकांनीही आपल्या सामाजिक जबाबदारी समजून तसं वागलं पाहिजे मात्र असे आपल्याकडे फार क्वचित होताना दिसते.रस्ते म्हणजे कसेही वापरण्याची बाब नव्हे तो आमचा अग्रहक्कच इथपर्यंत आमची पोहच.त्यामुळे या बाबत खरे तर पालिका,महापालिका,ग्रामपंचायती यांनी जनजागृती करायलाच हवी. जेथे ती होत नाही तेथे पोलिसांनी पुढाकार घेऊन कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे तरच आमचे सार्वजनिक आरोग्य ठीकठाक राहील.कोपरगावात शहर पोलिसांनी नेमकी हीच भूमिका निभावली असून त्यांचे कार्य म्हणूनच कौतुकास पात्र ठरते.एरव्ही पोलिसही कामचुकारकिचेच प्रदर्शन करताना दिसत असतात.मात्र कोपरगाव शहर पोलीस त्याला अपवाद ठरले आहेत.त्यांनी आपली गस्त चालू असताना वरील वास्तव चौकात असाच रस्त्याचा दुरुपयोग आढळल्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो,कॉ,रामकृष्ण गोरख खारतोडे यांनी चक्क अख्ख्या कुटुंबावरच गु.र.न.397/2019 भा.द.वि.341,283,महा.पोलीस अधिनियम 37(1)(3) अन्वये जिल्हा दंडाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहे.त्यामुळे रस्त्यांचा कसाही वापर करणाऱ्या अपप्रवृत्तीस चांगलाच चाप बसण्यास मदत होणार आहे.या बाबत पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.