जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
मोठ्या उद्योजकांचे सरकारला व सामान्य नागरिकांनाही स्वागत करावेच लागेल परिवर्तन हा संसाराचा नियम आहे त्यामुळे आता मॉल संस्कृतीचे स्वागत करायलाच हवे,सुरुवातीला संगणकाला,मोबाईलला विरोध झाला पण आज त्याचे सर्वांनी स्वागत केले आहे किंबहुना आज त्याशिवाय माणूस आपले व्यवहार सुरळीत ठेऊ शकत नाही त्यामुळे आता मॉल संस्कृतीला आपल्याला स्वीकारावे लागेल त्यात काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्याचे परिमार्जन जरूर केले जाईल आपण केंद्रीय समितीत असून त्या बाबत नक्कीच आवाज उठवू असे कान टोचून आश्वासन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी आज दिले आहे.
“सरकार चांगले आहे पण अंलबजावणीत त्रुटी आहे.मॉल संस्कृतीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने विरोध केला पण उपयोग झाला नसल्याचे सांगून आज दोन टक्के भांडवलदार हे ९८ टक्के छोट्या गुंतवणूंकदारांणा उध्वस्त करत असेल तर सरकारला विचार करावा लागेल असा इशारा दिला आहे.व जी.एस.टी. वाढल्यापासून एम.आर.पी.वाढली आहे”-संतोष मंडलेचा.अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स.
रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या निर्णयामुळे अनेक बड्या जागतिक कंपन्यांना भारताची दारे खुली झाली आहेत.मोठी मल्टीब्रँड दुकाने किमान दहा लाख लोकसंख्येच्या शहरांत उघडण्यास प्रारंभ झाल्याने किरकोळ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.या मॉल्सचा छोट्या व्यावसायिकांवर परिणाम होईल अशी ओरड होत आहे.हे छोटे दुकानदार या मॉल संस्कृतीमुळे उध्वस्त होतील ही भीती वाटत असल्याने या विरोधात कोपरगाव व्यापारी महासंघाने आवाज उठविण्यास प्रारंभ केला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उत्तर महाराष्ट्र व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात होती त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.
सदर प्रसंगी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा,शांतीनाथ लोहाडे,रिटेल संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री सचिन निवगुडे,उद्योजक कैलास ठोळे,उपाध्यक्ष केशव भवर,आदीसह उत्तर महाराष्ट्रातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”पारंपारिक व्यापाराचे मोल आहेच ते आपण नाकारू शकत नाही.त्याचे योगदान सरकारला माहित आहे.मोदी सरकार सर्वाधिक संवेदनशील व कृतिशील आहे म्हणून अनेक कालबाह्य कायदे सरकारने रद्द केले आहे.त्यामुळे तक्रारी करण्यात वेळ घालवू नका.परिस्थितीशी जुळवून घ्या.एम.आर.पी.व चुकीच्या जाहिरातीत असतील त्या बाबत नक्कीच योग्य निर्णय घेतले जातील यात शंकाच नाही मोदी सरकार हे भाजपच्या निवडक सदस्यांची बैठक घेऊन त्या बैठकीत देशभरातील जनतेच्या तक्रारींचा कानोसा घेते व त्या उपस्थित कार्यकर्त्यांना विचार मांडण्याची संधी दिली जाते त्यामुळे त्यावर निर्णय घेतला जाईल मात्र म्हणून धरधोपट या मॉल संस्कृतीला विरोध करू नका असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले आहे.आपण तुमचा पोष्टमन म्हणून नकीच काम करू.त्या साठी त्यांनी संगमनेर बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्याचे उदाहरण दिले आहे त्यावेळी अतिक्रमण काढण्यास व्यापाऱ्यांनी विरोध केला त्यामुळे आज गाड्या पार्किंगला जागा राहिली नाही त्यामुळे अनेकांना आपले व्यवसाय शहराबाहेर न्यावे लागले आहे याचे उदाहरण देऊन उपस्थित व्यापाऱ्यांना कान पिचक्या दिल्या आहेत.व आपण हि कोपरगाव,संगमनेर आदि ठिकाणी चहा पावडरची विक्री वीस वर्षांपूर्वी केली आहे.मात्र मोदींच्या चहाची जेवढी चर्चा झाली तेवढी आपल्या चहा पावडरची झाली नाही असे शल्य त्यांनी भाषणाच्या ओघात हसत-हसत बोलून दाखवले आहे.एखादा व्यापारी जादा सेवा देत असेल तर त्याची तक्रार करून भागणार नाही आपल्याला त्या का देता येत नाही याचा विचार करावा लागणार आहे.लोकल फॉर व्होकल हि पंतप्रधान मोदी यांची घोषणा आहे.अशी आठवणही त्यांनी या वेळी शेवटी करून दिली आहे.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे म्हणाले की,”कोरोना काळात व्यापाऱ्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे.अनेकांना अन्नदान केले आहे.त्याचे कौतुक कोणी केले नाही.उद्योजकांना,शेतकऱ्यांना,पशु-पालकांना,नोकरदारांना पुरस्कार दिले जातात मात्र व्यापाऱ्याला कोणी पाठीवर थाप मारत नाही असे शल्य बोलून दाखवले आहे.व्यापारी हा महत्वाचा घटक आहे.त्याच्या समस्या पंतप्रधान मोदी यांचे समोर मांडव्या,मोठे मॉल कमी वजन व ज्यादा दर हा मंत्र राबवून व ज्यादा जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करत आहे.या बाबत व्यापारी महासंघाने भांडाफोड केला आहे.आमची वकिली मोदींकडे करावी अशी मागणी केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले आहे तर उपस्थितांना शांतीनाथ लोहाडे,रिटेल संघटनेचे राष्ट्रीय सचिव सचिन निवगुडे,महासंघाचे उपाध्यक्ष केशव भवर यांनी मार्गदर्शन केले आहे.यावेळी विविध भागातून आलेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या भूमिका यावेळी मांडल्या आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत लढ्ढा यांनी मानले आहे.
Leave a Reply