..त्या नळजोडण्या करणार कमी पण त्यां देणारांचे काय ? वहाडणे

..त्या नळजोडण्या करणार कमी पण त्यां देणारांचे काय ? वहाडणे

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील अनेकांना चोवीस तास,बारा तासांच्या नळ जोडण्या या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी दिल्या त्या काढायला आपण तयार आहे पण या पूर्वी ज्यांनी पैसे देऊन त्या खिरापती सारख्या वाटल्या त्यांचे तुम्ही नेमके काय करणार ? असा तिखट सवाल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये भाजप (कोल्हे गटाच्या ) नगरसेवकांना विचारला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून बेजाबदारपणे सत्ता भोगणाऱ्यांनी पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडवला आहे.सत्ता भोगून झालेलेच काहीजण आज पाणी का पुरत नाही,दिवसाआड पाणी द्या,मुख्य जलवाहिणीवर नळजोड का तोडत नाही ? असे विचारत आहे-नगराध्यक्ष विजय वहाडणे

कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना भेटून शहराला दिवसाआड पाणी देण्याची मागणी करून पिण्याच्या पाण्याचा अकाली शिमगा सुरू केल्याने त्यास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे.या खेरीज नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीही त्याला आज एक प्रसिद्धी पत्रकान्वये आपल्या वहाडणे शैलीत तिखट उत्तर दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव नगरपरिषद मेन लाईनवरील नळजोड का तोडत नाही ? असे विचारणाऱ्या हुशार (?) व्यक्तींना आपण जाहीरपणे सांगतो कि,”वर्षानुवर्षे कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता ताब्यात असतांना अनेक माजी नगराध्यक्ष-नगरसेवक व नेत्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता मनमानी करून वेळोवेळी चुकीच्या पद्धतीने नळजोड दिले.त्यातील काहींनी पैसे खाऊन,काहींनी प्रभागामध्ये मतदार खुष ठेवून राजकारण करण्यासाठी तर काहींनी नेत्यांच्या आदेशावरून मुख्य जलवाहिनीवर नळजोड देऊन ठेवले.त्यामुळेच त्यातील काहींना २४ तास,काहींना १२ तास,काहींना ०८ तास,काहींना ०६ ते ०४ तास पाणी मिळते.सर्वसामान्य नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून बेजाबदारपणे सत्ता भोगणाऱ्यांनी पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडवला आहे.सत्ता भोगून झालेलेच काहीजण आज पाणी का पुरत नाही,दिवसाआड पाणी द्या,मुख्य जलवाहिणीवर नळजोड का तोडत नाही ? असे विचारत आहेत.निवेदने-बातम्या-फोटो देऊन आपल्यालाच जनतेची फार काळजी असे भासवत आहेत.असे नाटक रंगवत आहे.कुठलाही विचार न करता मुख्य जलवाहिणीवर नळजोड तोडायचे ठरल्यास शहरातील अनेक रस्ते फोडावे लागतील.म्हणून रस्त्यांचे नुकसान न करता बेसुमार पाणी वापरणारे नळजोड कमी नियोजन सुरू आहे.
नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नविन सेवक झोपेतून जागे झाले आहेत,होत आहेत.आपण त्यांना नम्रपणे जाहिर करतो कि, बेसुमार पाणी वापर होणारे नळजोड कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तोडले जातील तसे नियोजन सुरू आहे.बेसुमार पाणी वापरणारे कोण कोण आहेत ? हे नगरपरिषदेत येऊन तुम्ही पाहू शकता.मुख्य जलवाहिणीवर नळजोड असलेले माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी मात्र सन-२०१२ मध्येच स्वतःहून नगरपरिषदेला पत्र दिले व माझे मुख्य जलवाहिनीवरील नळजोड बदलून उपवाहिनीवर घ्यायला आपण तयार आहे.झावरे यांनी मनाचा मोठेपणा दाखविला तसा मनाचा मोठेपणा दाखविणे इतरांना का जमले नाही ?
अनेकजण नगराध्यक्षपद भोगून गेले त्यांनी असे नळजोड का तोडले नाहीत,पैसे खाऊन का नळजोड वाटले? याचे जनतेला उत्तर द्या.मी मात्र असे नळजोड कमी करून शहराचे पाणी वाचविण्यासाठी काम करत आहे याची खात्री बाळगावी असे आश्वासनही नगराध्यक्ष
विजय वहाडणे यांनी शेवटी दिले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.