जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतिबंध लागू करण्याबाबतचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे शाळांमध्ये शिपाई पद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा कोपरगाव तालुका शिक्षकेतर संघटनेने दिला आहे.
राज्यातील सर्व खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृती बंध निश्चित करण्यात आला आहे.त्यानुसार शाळेमधील शिपाई पद आता रद्द करण्यात आले आहे त्याचें प्रतिकूल पडसाद उमटू लागले आहे.
राज्यातील सर्व खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृती बंध निश्चित करण्यात आला आहे.त्यानुसार शाळेमधील शिपाई पद आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ५२ हजार पदांवर गंडांतर आले आहे. आता शाळेचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज करण्यासोबतच शाळेची घंटा कोण वाजवणार,असा प्रश्न शाळांसमोर निर्माण झाला आहे
कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षकेतर संघाच्या वतीने शासनाच्या निर्णयाच्या आदेशाचा निषेध करून कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी ११ डिसेंबर २०२० च्या आदेशाची होळी करण्यात आली आहे.
या वेळी शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष वाल्मिक काकडे,तालुका मुख्याध्यापक संघ सचिव शिवाजी लावरे, शिक्षकेतर संघटनेचे सचिव दत्तात्रय बर्गे, उपाध्यक्ष शैलेश गाडेकर,गणेश गोसावी,विष्णुपंत ढोले,बाळू विखे,नितीन जाधव,कैलास सातपुते,मारुती काटे, जितेंद्र बोरा. कमलेश गायकवाड मेहरखांब. गागरे. रमेश लोखंडे,दिवे,शशिकांत जैन,साईनाथ नाईक,राजू उनवणे, विठ्ठल मोरे, नेताजी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply