इंधन दरवाढ,केंद्र सरकार विरोधात कोपरगावात आंदोलन

इंधन दरवाढ,केंद्र सरकार विरोधात कोपरगावात आंदोलन

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे.महागाईत वाढ होत आहे.त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात कोपरगाव शहरामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला जागे करण्यासाठी इंधन दरवाढी बाबत केंद्र सरकार विरोधात शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले आहे.

कोरोना ताळेबंदीच्या काळात जून महिन्यात वीसहून अधिकवेळा पेट्रोल,डिझेलच्या दरात वाढ झाली होती, त्याचीच पुनरावृत्ती सुरू आहे.सलग सहाव्या दिवशी पेट्रोल दरवाढ झाल्यामुळे पेट्रोलच्या किमती ९१ ते ९३ रुपयांच्या घरात पोहोचल्याने राज्यात संताप व्यक्त होत आहे.त्याचे पडसाद कोपरगावात नुकतेच उमटले आहेत.

कोरोना ताळेबंदीच्या काळात जून महिन्यात वीसहून अधिकवेळा पेट्रोल,डिझेलच्या दरात वाढ झाली होती, त्याचीच पुनरावृत्ती सुरू आहे.सलग सहाव्या दिवशी पेट्रोल दरवाढ झाल्यामुळे पेट्रोलच्या किमती ९१ ते ९३ रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत.ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर लवकरच पेट्रोल दराचेशतकआणि वाहनधारकांचीशंभरीभरेल.इंधन दरवाढीच्या माध्यमातून लूट करून देश चालवण्याचे तंत्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने विकसित केले आहे. २०१४ मध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारविरोधात नरेंद्र मोदींसह भाजपच्या तमाम नेत्यांनी रान उठवले होते.

आता रान उठवणाऱ्या भाजपचे सरकार सत्तेत असताना ही दरवाढ समर्थन कारी कशी ठरू शकते असा रास्त सवाल शिवसेनेने विचारला आहे.निव्वळ पेट्रोल,डिझलच्या किमतीत वाढ झालेली नसून घरगुती गॅस,विरोधात शिवसेनेने एल्गार केला आहे. यावेळी केंद्र सरकारविरोधात व शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,ग्राहक संवरक्षक कक्षचे जिल्हा प्रमुख मुकुंद सीनगर,शहर प्रमुख कलविंदर दडीयाल,भरत मोरे,अस्लम शेख,इरफान शेख, विक्रांत झावरे,विशाल झावरे,गगन हाडा,नगरसेविक सपना मोरे, वर्षा शिंगाडे,राखी विसपुते,शीतल चव्हाण,संजय गुरसळ, कुकुशेठ सहानी,भूषण पाटणकर,राहुल देशपांडे,सतीश शिंगाने,अक्षय नंनवरे,राहुल होन,मोनू राऊत,प्रफुल्ल शिंगाडे,योगेश मोरे,आकाश कानडे,निशांत झावरे,राहुल हासावल,बाळासाहेब साळूखे,सलीम कांदेवाले,अशोक कानडे,पप्पू देशमुख, गोपाळ वैरागळ,अंबादास वाघ, विजय सोनवणे,गुरमित दडीयाल, वैभव गीते, हलवाई,अविनाश धोक्रट,पप्पू पेकळे,यश जाधव,अजय दळे,प्रवीण शेलार,योगेश जगताप,रफिक शेख,उमेश छुगानी, विकास शर्मा,किरण कुर्हे ,सचिन आसने आदींसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका सपना मोरे म्हणाल्या की,”रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना चीन व पाकिस्तान पुरस्कृत म्हणत आहे.ते रावसाहेब दानवे हेच चीनचे हस्तक आहे.केंद्र सरकारने खोट्या जाहिराती केल्या असून उज्वला गॅस परवडत नाही.केंद्र सरकारच्या खोट्या आश्वासन व भूलथापा मारण्याचे काम करत आहे.

माजी आमदार ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात फक्त पुनता मावशीच्या प्रेमा प्रमाणे करतात.त्यांना जर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची एवढीच काळजी असेल तर वीज बिला विरोधात जसे आंदोलन केले तसेच आंदोलन महागाई विरोधात करावे.
यावेळी मुकुंद सीनगर म्हणाले की,”खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून लुटण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.पेट्रोल डिझेलच्या महागाई वर हे नियंत्रण ठेवण्यास असमर्थ सरकार आहे.रावसाहेब दानवे हे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम करत असून त्यांचा निषेध शिवसेना राज्यभरात करत आहे.

शहर प्रमुख कलविंदर दडीयाल म्हणाले की,रावसाहेब दानवे यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही.दानवे यांनी स्वतःचे घर,जावई सांभाळावे तोंडाला येईल ते शेतकऱ्यांविषयी बडबडू नये.माजी आमदार यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले तसेच आंदोलन केंद्र सरकार विरोधात करण्याची सद्बुद्धी साई बाबा आपणाला देवो असे दडीयाल म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस.टी. कामगार सेनेचे शहर प्रमुख भरत मोरे तर आभार डाऊचचे सरपंच संजय गुरसळ यांनी मानले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.