जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण अभिवादन कार्यक्रम कोपरगाव येथे भारतीय बौद्ध महासभा व बहुजन विकास एकता समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.व तयावेळी डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे.
डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.त्यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त त्याना कोपरगावात सेवानिवृत्त न्या.जे.सी.हुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले आहे.
त्यावेळी जि सं सचिव रामदास सोनवणे,समता सैनिक जि उपाध्यक्ष कमांडर रवींद्र जगताप,तालुका अध्यक्ष पंडित भारूड,कोषाध्यक्ष रावसाहेब वाघ,तालुका उपाध्यक्ष संतोष मैंद,शहर अध्यक्ष अनिता साळवे, उपाध्यक्ष उज्वला पवार,माजी पोलीस अधीक्षक के.पी.रोकडे,माजी न्यायमूर्ती जे.सी. हुसळे, बहुजनचे मछिंद्र खरात,रावसाहेब पाईक,नगरसेवक संजय पवार,माजी नगरसेविका मायाताई खरे,नगरसेविका हर्षदा कांबळे,समता सैनिक सीमा जगताप, वत्सला दिवे,आर.पी.आयचे अध्यक्ष जितेंद्र रणशुर, बुद्धिस्ट यंग फोरचे विजय त्रिभुवन,दगडू पवार,नानासाहेब साळवे,प्राचार्य उबाळे सर आदि उपासक उपासिका मोठया संख्येने अभिवादनासाठी मास्क लावून हजर होते.यावेळी वदंना,त्रिशरण,पंचशील सामुदायिक घेण्यात आली.
यावेळी सूत्रसंचलन भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष पंडित भारूड यांनी केले आहे.
Leave a Reply