जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावचे माजी आमदार कै.के.बी.रोहमारे यांच्या २३ व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सोमवार दिनांक ७ डिसेबर रोजी होणार असून त्या दिवशी सकाळी ७.३० वा.के.जे.सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व संचालक कै.के.बी.रोहमारे यांच्या पोहेगाव येथील समाधीस पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करतील व या कार्यक्रमाची सुरवात होईल.
या वर्षी (२०१९ ) संदीप जगदाळे (पैठण),प्रवीण बांदेकर(बांदा,सिंधुदुर्ग), प्रभाकर शेळके (जालना),बाळू दुगडूमवार (नांदेड) या लेखकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नंतर सकाळी १०.०० वा.सोमैया महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात कै.के.बी.रोहमारे यांनी सुरु केलेल्या राज्य पातळीवरील भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कारांचे वितरण जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा.श्रीकांत बेडेकर यांच्या शुभहस्ते व सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सुभाष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
तरी या पुण्यस्मरण व वाङ्मयीन कार्यक्रमासाठी तालुक्यातील कै.के.बी.रोहमारे यांच्यावर स्नेह असणाऱ्यांनी व साहित्य रसिक श्रोत्यांनी सामाजिक अंतराचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,संस्थेचे सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,संचालक संदीप रोहमारे,व अन्य मान्यवरांनी केले आहे.
Leave a Reply