जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चास नळी ग्रामपंचायत हद्दीतील महिला छाया शरद पवार (वय-२८) या घरी घसरून पडल्याने त्यांना मणक्याच्या उपचारासाठी नाशिक येथील धाडीवाल हॉस्पिटल येथे भरती केले असता त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाल्याची खबर तेथील उपचार करणाऱ्या डॉ.रुचिता धाडीवाल यांनी तेथिल पोलीस ठाण्यात दिली असून तेथील पोलिसानी हि बाब कोपरगाव येथील तालुका पोलिसांना कळवली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृत महिला छाया पवार या दि.१३ नोव्हेम्बर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आपला पाय घसरून पडल्या होत्या.त्याना प्रथम उपचारासाठी नाशिक येथील सोपान हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.त्या नंतर त्यांना डॉ.धाडीवाल येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते.तेथे उपचार सुरु असताना दि.१७ नोव्हेम्बर रोजी तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत महिला छाया पवार या दि.१३ नोव्हेम्बर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आपला पाय घसरून पडल्या होत्या.त्याना प्रथम उपचारासाठी नाशिक येथील सोपान हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.त्या नंतर त्यांना डॉ.धाडीवाल येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते.तेथे उपचार सुरु असताना दि.१७ नोव्हेम्बर रोजी तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.त्यांची नोंद प्रथम मुंबई नाका येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.त्यांनी हि घटना जावक क्रमांक ६३९१/२०२० दि.२४ नोव्हेम्बर रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केल्याने त्या घटनेची नोंद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तक ५६/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.चंद्रकांत तोर्वेकर हे करीत आहेत.
Leave a Reply