जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्तान अभिवादन करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.त्यांच्या कार्याचे या निमित्ताने स्मरण करण्यात आले आहे.
या प्रसंगी श्री.गो.विदयालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन अनिल काले यांनी तर आभार अनिल अमृतकर यांनी मानले.या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य संदीप अजमेरे,विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,लकारे आर.आर,शिरसाळे एस.एन,कोताडे ए.जे,व्ही.एम.आव्हाड,गोसावी के.एस.सौ.महानुभाव के.एच.बोरावके आर.आर.गायकवाड ए.जी.रायते यु.एस,वाडीले एस.एस,तुपकर आर.एस आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन केले आहे.
Leave a Reply