जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १८१ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात १३ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी अन्य ८४ स्राव पाठवले आहे तर नगर येथुन आलेल्या अहवालात एक स्राव बाधित आला आहे तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेत ०१ रुग्ण बाधित आढळले आहे. आज एकूण १५ जण बाधित आले आहे.तर आधी भरती असलेल्या १० रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.आज शहरात रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६४ हजार १८२ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९५६ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत असताना आज शहरात त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात आज १२ रुग्ण आढळले आहे.त्यात गजानन नगर एक पुरुष वय-४१,साईनगर येथील एक पुरुष वय-५८,३२,एक महिला वय-५०,विवेकांनंद नगर एक पुरुष वय-४५,बालाजी नगर एक महिला वय-४७,दोन पुरुष वय-५५,२३,सह्याद्री कॉलनी एक महिला वय-२१,निवारा एक पुरुष वय-६०,जुना टाकली रस्ता एक पुरुष वय-४०,इंगळे नगर एक महिला वय-७१ आदींचा समावेश आहे.शहरात रुग्ण वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र आज शहर पोलिसानी आज बेताल नागरिकां विरुद्ध कारवाई सुरु केल्याने नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
तर ग्रामीण भागात ०३ रुग्ण बाधित आढळले आहे त्यात ,जेऊर पाटोदा दोन महिला वय-५२,२० चासनळी एक महिला वय-४०आदी रुग्ण बाधित आढळले आहे.कमी रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात दिलासा मिळाला आहे.
Leave a Reply