जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत गत दोन दिवसापासून एक वाघाची जोडी दिसून आली असून हि जोडी आज दुपारी दोनच्या सुमारास येथील ग्रामस्थ विठ्ठल रंगनाथ सोनवणे यांनीं मकेच्या शेतात पाहिल्याचा दावा केला आहे त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान काल मध्य रात्रीच्या सुमारास या वाघांनी परिसरातील वस्त्यांवर आपली हजेरी लावल्याने गायी,वासरे,म्हशी आदी पशु धनाची तर शेतकऱ्यांचा विश्वासू मित्र म्हणून ओळख असलेल्या कुत्रांची पाचावर धारण बसली असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे या बाबत कोपरगाव वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्राण्यांच्या पायाच्या ठशांची खातरजमा करून शेतकऱ्यांना खुलासा करण्याची मागणी ग्रामस्थानीं केली आहे.
या वर्षी पर्जन्य मोठ्या प्रमाणात झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी आगामी काळात रब्बी पिकांना भविष्य निर्माण झाले आहे.रब्बी पिकांची पेरणी जवळपास चाळीस टक्के झाली आहे.अजून अनेक ठिकाणी या पिकांची उभारणी सुरू आहे.तर काही ठिकाणी अद्याप या पिकांची निंदणी-खुरपणी करण्यास प्रारंभ झाला आहे.त्यातच महावितरण कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना विज पुरवठा दिवसा करण्याऐवजी रात्री सुरू आहे.त्यामुळे या घटकांची जोखीम वाढली आहे.त्यातच मकाच्या शेतात वाघांची जोडी असल्याची बातमी पसरल्या मुळे तर शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली आहे.आज दुपारी तर मारुती वाघ या शेतकऱ्याच्या शेतानजीक आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वाघांची जोडी विठ्ठल सोनवणे यांनी पाहीली आहे.त्यामुळे या भीतीत अधिकची भर पडली आहे.
दरम्यान काल मध्य रात्रीच्या सुमारास या वाघांनी परिसरातील वस्त्यांवर आपली हजेरी लावल्याने गायी,वासरे,म्हशी आदी पशु धनाची तर शेतकऱ्यांचा विश्वासू मित्र म्हणून ओळख असलेल्या कुत्रांची पाचावर धारण बसली असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे या बाबत कोपरगाव वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्राण्यांच्या पायाच्या ठशांची खातरजमा करून शेतकऱ्यांना खुलासा करण्याची व दिलासा देण्याची मागणी सेनेचे मुंबई स्थित नेते व मूळ बहादरपूर रहिवाशी शिवाजी रहाणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.
Leave a Reply