जनशक्ती न्यूजसेवा
धारणगाव-(संजय भारती)
कोरोना संसर्गाचा पाश्र्वभूमीवर लागु केलेल्या टाळेबंदी काळात कुंभारी गावात पोलिस पाटील उल्हास मेढे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम नियोजित पद्धतीने केल्याबद्दल तसेच डॉ.विजय गोडगे यांनी रुग्णांची सेवा केल्याबद्दल कुंभारी ग्रामस्थांचा वतीने छोटेखानी कार्यक्रमात जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण पैठणे यांच्या हस्ते त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यात कोरोना साथीने अद्यापपर्यंत चाळीस रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.साथ ग्रामीण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.या साथीला नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन,अंगणवाडी सेविका आदींनी निर्णायक भूमिका निभावल्याने हि साथ नियंत्रणात राहिली आहे.त्यामुळे या कोरोना योद्धयांचा सत्कार कुंभारी ग्रामस्थांनी आयोजित केला होता.
सदर प्रंसगी अशोक वारूळे सर,पैठणे सर,गिताराम ठाणगे सर,विनोद थोरात,राजु वारूळे, विकास वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण पैठणे सर,अशोक वारूळे सर,गिताराम ठाणगे सर,सुभाष जगदाळे सर,सोपानराव चिने,पत्रकार राजेंद्र तासकर विनोद थोरात,चंद्रभान कदम,धनवटे मामा,प्रमोद चिने,सचिन बढे,विकास वाघ,कचेश्वर माळी,राजु वारूळे,प्रकाश डांगे यांसह आयोजक नारायण राजगुरू व विकास खळे आदींसह ग्रामस्थही उपस्थित होते.
पोलीस पाटील उल्हास मेढे यांनी कोरोना संसर्गाच्या काळात कुंभारी गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवुन, कोरोना समितीचा माध्यमातुन बाहेरगावाहुन गावात आलेल्या नागरीकांना विलगीकरन करणे,गावात कुणाला कोरोना सदृश्य लक्षणे आढळ्यास काही वेळातच आरोग्य विभागास माहीती देउन पुढील कार्यवाही सुरू करणे तसेच कोरोना बाधीत रूग्णांच्या कुंटुबियांना आधार देण्याचे काम पोलिस पाटलांनी केले आहे.या खडतर काळात स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता प्रशासनाचे आदेशाची कडक अंमलबजावणी करताना वेळेला नियम मोडणाऱ्या वर कडक कारवाई केली आहे.म्हणुनच तालुक्यातील इतर गावांच्य तुलनेत कुंभारी गावात कोरोना बाधीतांची संख्या नगण्य होती व आता गाव कोरोना मुक्त आहे.या शब्दात अशोक वारूळे सर यांनी मेढे पाटलांच्या कामाचे कौतुक केले.डॉ.विजय गोडगे सर यांचे कौतुक करताना अशोक वारुळे म्हणाले की टाळेबंदीचा काळात डॉ गोडगे यांनी शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेत आपल्या जिवाची पर्वाता कोरोना व्यतिरीक्त आजारावर उपचार केले असुन गावात कोरोना संसर्गा बद्दल जनजागृती करण्याचे कामही त्यांनी केले आहे.कोरोना कालखंड वगळता मागील काळात घडयाळाची पर्वा न करता त्यांनी रूग्णांची सेवा केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले सदर प्रसंगी कोरोनावर मात केलेले ललित निळकंठ,सचिन कदम यांच्या वतिने वडील चंद्रभान कदम,जनार्दन खळे यांचे वतिने विकास खळे यांचाही सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर सेनादलातील आपली सेवा पूर्ण करून आलेले विनोद थोरात यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास खळे यांनी केले तर अशोक वारूळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले
Leave a Reply