कोपरगावात एकाची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद

कोपरगावात एकाची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या लक्ष्मीनगर येथिल रहिवाशी आज पहाटे ५.२५ वाजेपुर्वी हसन गुलाब शेख (वय-४५) यांनी अज्ञात कारणाने आपल्या घरात आत्महत्या केली आहे.त्यामुळे लक्ष्मीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

लक्ष्मीनगर या परिसरात मयत इसम हा आपल्या कुटुंबासमवेत रहात होता.मात्र आज सकाळी ५.२५ वाजेच्या दरम्यान मयत इसमाने आपली जीवनयात्रा अज्ञात कारणाने संपवली आहे.

कोपरगाव शहराच्या पश्चिमेस साधारण एक कि. मी.अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर या परिसरात मयत इसम हा आपल्या कुटुंबासमवेत रहात होता.मात्र आज सकाळी ५.२५ वाजेच्या दरम्यान मयत इसमाने आपली जीवनयात्रा अज्ञात कारणाने संपवली आहे.ही बाब सकाळी त्यांच्या लक्षात आली.या प्रकरणी अन्य नातेवाईक व नजीकच्या नागरिकांनी त्यानां उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णलयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तकात क्रं.४३/२०२० सि. आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच. गायमुखे हे करीत आहेत.

Tags

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.