जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २०२ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात १८ बाधित आढळले आहे.तर २९ संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे तर आज नगर येथील ०२ तर खाजगी प्रयोग शाळेतील ०१ असे एकूण बाधित २१ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.दरम्यान आज कोपरगाव शहरातील एक ६३ वर्षीय पुरुष व माहेगाव देशमुख येथील एक ६० वर्षीय पुरुष असे दोघांचे निधन झाले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ४३ हजार ७३८ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ७०० जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत सप्ताहात दिवसात चार बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात ०४ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात १७ असे २१ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण ग्रामीण भागातील रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तर शहरात लक्षणीय रित्या रुग्ण कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आज कोपरगाव ग्रामीण भागात आढळलेल्या बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे मंजूर पुरुष वय-३४, रेल्वे स्थानक पुरुष वय-३६, संवत्सर पुरुष वय-३७, वारी पुरुष वय-५२,महिला वय-१९,४५,कुंभारी पुरुष वय-४६,साखरवाडी पुरुष वय-३६,माहेगाव पुरुष वय-२०,६०,५६ व महिला वय-५३,दहिगाव बोलका पुरुष वय-२८,५१,उक्कडगाव पुरुष वय-५०,८५,कोळपेवाडी पुरुष वय-५८, रुग्णांचा समावेश आहे.
तर कोपरगाव शहरात आढळलेले रुग्ण पुढील प्रमाणे-सुभाषनगर पुरुष वय-३०,महिला वय-६५,सबजेल पुरुष वय-३५,गुलमोहर कॉलनी महिला वय-२८ आदी चार रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ८९३ इतकी झाली आहे.त्यात ११३ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३५ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८४ टक्के आहे.आतापर्यंत ०९ हजार १२२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ३६ हजार ४८८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.०७ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १ हजार ७४५ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९२.१८ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील समान बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.
Leave a Reply