जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील हनुमाननगर या ठिकाणी फिर्यादी महिला आपल्या घरातील स्वयंपाक घरात काम करत असताना त्याच गावातील आरोपी अनिल शिवाजी वाघ याने मागील बाजूने येऊन फिर्यादी महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असता या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला हि आपल्या घरात गुरुवार दि.१ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काम करत असताना आरोपी अचानक अनाधिकाराने त्या घरात प्रवेश करून या महिलेला मागील बाजूने येऊन तिला कवळी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४९४/२०२९ भा.द.वि.कलम ४५२,३५४ प्रमाणे आरोपी अनिल वाघ याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.पी.बी.काशीद हे करीत आहेत.
Leave a Reply