जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२८ सप्टेंबर रोजी गजानननगर येथील रहिवाशी इसम राहुल धोंडिबा कांबळे (वय-३५) या इसमाचे बेशुद्ध पडून अकस्मात निधन झाले आहे.त्यांना श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे उपचारार्थ दाखल केले असता त्यांनी वैद्यकीय तपासणी नंतर मृत घोषित केले आहे.
मयत इसम आधी घरीच बेशुद्ध पडले होते.त्याना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल केले होते.तेथे त्यानां मृत घोषित करण्यात आले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी अकस्मात मृत्यूची दप्तर क्रं.४२/२०२० सि.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.
Leave a Reply