जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामनाथ आसाराम काळे (वय-५९)यांचे आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे.ते ३१ मे २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले होते.
त्यांनी रयत सेवक मित्रमंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी जून २००८ पासून बारा वर्ष सांभाळली होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाने रयत शिक्षण संस्थेचे उत्तर जिल्हा अध्यक्ष आ.आशुतोष काळे,गोदावरी-परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
Leave a Reply