जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १७८ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात १३ बाधित आढळले आहे.तर ३९ संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील ०२ तर नगर येथील एक बाधित निघाला असून नगर प्रयोग शाळेत तपासणीसाठी ३६ स्राव पाठवले आहे.आज एकूण बाधित १६ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.दरम्यान आज ग्रामीण भागात आढळलेली रुग्ण वाढ मोठी असून ग्रामीण भागात १३ तर शहरी भागात केवळ ०३ रुग्ण वाढले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.आज कोरोनाने वारी ग्रामपंचायत हद्दीतील एक महिलेचे निधन झाले आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ४० हजार ७५८ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ६६१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून ३२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत सप्ताहात दिवसात चार बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात ०३ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात १३ असे १६ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव ग्रामीण भागात आढळलेल्या बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे समता नगर पुरुष वय-२१, मेंन रोड महिला वय-४०,मोहिनीराज नगर पुरुष वय-५१. आदींचा समावेश आहे.
तर कोपरगाव शहरात आढळलेले रुग्ण पुढील प्रमाणे-संजीवनी कारखाना परिसर तीन पुरुष वय-५७,२३,२५ तर एक महिला वय-२१,शिंगणापूर पुरुष वय-३१,माहेगाव देशमुख दोन पुरुष वय-२०,४७,दोन महिला वय-५३,५०, मंजूर पुरुष वय-२९, कासली पुरुष वय-२२,वारी पुरुष वय-८७ आदींचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ८०७ इतकी झाली आहे.त्यात १६० रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३२५८८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७७ टक्के आहे.आतापर्यंत ०८ हजार ३६१ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ३३ हजार ४४४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.६१ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १ हजार ६३४ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९०.४२ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण भागातील मोठ्या बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.
Leave a Reply