जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व रांजणगाव देशमुखसह परिसरात धार्मिक विधीसाठी आपली सेवा पुरविणारे गुरु म्हणून ज्यांनी आपला लौकिक स्थापित केला होता ते तुषार काथे (वय-५२ ) यांचे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामस्थांच्या उपस्थितीत रांजणगाव देशमुख येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते जय हनुमान माध्यमिक विद्यालयातील स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य होते.
Leave a Reply