इनोव्हा-मोटारसायकल अपघात,एक जखमी

इनोव्हा-मोटारसायकल अपघात,एक जखमी

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड या रस्त्याची दुरावस्था झाली असून पुणतांबा चौफुलीजवळ निर्माण झालेल्या खड्ड्याने अनेक अपघात होत असून अनेकांना आपला जीव वाचविणे मुष्कील बनले आहे.अशीच घटना दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली असून इनोव्हा (क्रं.१२ के.टी.४२४१) रस्ता खराब असल्याने चुकीच्या दिशेने चालकाने आपले वाहन घालून भाऊसाहेब आबनावे यांचे वस्तीसमोर समोरून येणाऱ्या व बजाज प्लॅटिना दुचाकीस (एम.एच.१७ सी.डी.२१३५) जोराची धडक दिली असून त्यात साकुरी ता.राहाता येथील इसम गंगाधर किसान दरेकर (वय-५८) यांना धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून याबाबत आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहरातून नगर कडून मालेगावकडे जाणारा राज्य मार्ग वर्तमान स्थितीत अत्यंत खराब झाला असून या मार्गावरून आपले वाहन घेऊन जाणे मोठे जोखमीचे व प्राणावर बेतणारे ठरत आहे.असाच अनुभव मुळचे धोंडेवाडी येथील मात्र साकुरीत स्थायिक झालेले शेतकरी गंगाधर किसन दरेकर यांना आला असून त्यानां इनोव्हाने दिलेल्या धडकेत ते जखमी झाले आहे.

कोपरगाव शहरातून नगर कडून मालेगावकडे जाणारा राज्य मार्ग वर्तमान स्थितीत अत्यंत खराब झाला असून या मार्गावरून आपले वाहन घेऊन जाणे मोठे जोखमीचे व प्राणावर बेतणारे ठरत आहे.असाच अनुभव मुळचे धोंडेवाडी येथील मात्र साकुरीत स्थायिक झालेले शेतकरी गंगाधर किसन दरेकर हे आपल्या कामासाठी गुरुवार दि.२४ सप्टेंबर रोजी कोपरगाव कडे जात असताना समोरून वरील क्रंनाकच्या इनोव्हा कंपनीच्या चालकाने चुकीच्या बाजूने आपले वाहन घालून बजाज प्लॅटिना या वरील वाहन चालकास जोराची धडक देऊन त्यास जखमी केले आहे.या प्रकरणी जखमीस ओळखीच्या नागरिकांनी शिर्डी येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.उपचारानंतर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

कोपरंगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.नं.७२९-२०२० भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७ व मोटार वहान कायदा कलम १३४,१८४,/१७७ प्रमाणे इनोव्हा वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.