कोपरगावात सहा जणांवर कारवाईचा बडगा !

कोपरगावात सहा जणांवर कारवाईचा बडगा !

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात अद्यापही कोरोना विषाणूची साथ अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत असून गत पाच महिन्यात ०१ हजार ७९१ जणांना कोरोना विषाणूंचा डंख झाला असून तर आजअखेर ३१ जणांचा मृत्यू झाल्याने आता परिणामस्वरूप कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून आज सकाळ पासून केलेल्या कारवाईत सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७९१ इतकी झाली आहे.त्यात १६० रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ३१ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या २६ झाली आहे त्यात कोपरगाव शहरातील ०७ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील २२ जण असे २९ नागरिक बाधित असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७९१ इतकी झाली आहे.त्यात १६० रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ३१ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई आज दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान केलेल्या कारवाईत शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत त्यात आरोपी भाऊसाहेब सुरेश बोरुडे (वय-३१) रा.कोर्ट रोड कोपरगाव,प्रसाद बाळू बोरसे (वय-२३),इंदिरानगर,वैभव फकीर घायवट (वय-१८),रा.दत्तनगर शिंगणापूर,करण शेषराव खोतकर (वय-२०),रा.दत्तनगर,ओंकार मंगेश शिवदे (वय-२३),दत्तनगर,शरद रामनाथ गायकवाड (वय-२३) रा.दत्तनगर आदीं सहा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गादीवर फोनवर बोलणे,शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश न पाळणे आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.७३०/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०, प्रमाणे मोटार वाहन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.