जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत झगडे फाट्या नजीक आज सकाळी ०६ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार कोपरगाव तालुका पोलिसानी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोंमास आढळून आले असून त्यावे विरोधात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे ३.५१५ टन वजनाचे व ६.७५ लाख किमतीचे गोमांस ट्रकसह जप्त करण्यात आले असून त्यावरील अज्ञात चालक फरार झाला आहे.
झगडे फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोमांस असलेला ट्रक उभा असल्याची एक गोपनीय माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.त्यांनी या बाबत आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले असता त्यांना घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुरूप एक ट्रक गोमांस भरलेला मात्र बंद स्थितीत आढळून आला.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत झगडे फाट्यानजीक सकाळी ०६ वाजेच्या सुमारास एक ट्रक बंद पडलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस असल्याची एक गोपनीय माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.त्यांनी या बाबत आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले असता त्यांना घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुरूप एक ट्रक (क्रं.एम.एच.१३ आर.७३१९) हा उभ्या स्थितीत आढळून आला.व त्यावरील चालक मात्र फरार झालेला होता.व सदर ट्रक मध्ये अज्ञात प्राण्यांच्या मांसाचा वास येत असल्याने पोलिसांनी पोहेगाव येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत साखरे यांना तातडीने पाचारण केले व त्याबाबत अभिप्राय मागितला असता सदरचे ट्रक हा गोमांसाचे असल्याचे उघड झाले होते.
या बाबत पोलिसानी सादर गाडी ताब्यात घेऊन त्यातील गोमांस अंदाजे किंमत ०१ लाख ७५ हजार रुपये किमतीचे जप्त करून चांदेकसारे ग्रामपंचायतीला सांगून त्याची विल्हेवाट लावली आहे.व सदरचा ट्रक सुमारे किमंत ०५ लाख रुपये एकूण ऐवज ०६ लाख ७५ हजार जप्त केला आहे.
व अज्ञात चालकाविरुद्ध गु.र.नं.४८१/२०२० महा.प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ व सुधारणा अधिनियम कलम ५ व ९ भा.द.वि.कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.
Leave a Reply