जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय व रयत संकुलातील के.बी.पी.माध्यमिक व तांत्रिक विद्यालय,डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज,पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्यामंदिर व कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
कर्मवीर भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करुन मोठे काम केले.ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला होता.
भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करुन मोठे काम केले.ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला होता.त्यांची जयंती कोपरगावात रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांनी उत्साहात साजरी केली आहे.
या प्रसंगी कोपरगाव विधानसभेचे सदस्य व रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे हे या कार्यक्रमास उपस्थित होते.या प्रसंगी के. बी. पी. विद्यालयातील डॉ. कर्मवीर भाऊरव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.आ.काळे यांनी रयत सेवकांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या.त्यांनी रयत शाखेच्या पाच शाखा प्रमुखांशी संपर्क साधून शैक्षणिक व अध्यापनातील अडचणी समजून घेतल्या व उपस्थिताना मार्गदर्शन केले.यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य,पद्माकांत कुदळे हे उपस्थित होते.त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे व अन्य शाखेतील मुख्याध्यापक काकळीज व्ही.व्ही.,दरेकर एस.एम.,आव्हाड ए.सी.,सुरवसे मॅडम व अनेक रयत शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
Leave a Reply