जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघातर्फे कर्मचारी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच आता संघाच्या कार्यक्षेत्रातील कृत्रिम रेतनतज्ज्ञांचाही २० लाख रकमेचा विमा उतरविणार असल्याचे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले.
दुग्ध व्यवसाय व पशुधन विकास कार्यक्रमांमध्ये गोदावरी दूध संघाचे कार्य राज्यात अव्वल असल्याचे सांगून भविष्यात पशुधन विकासाच्या ज्या ज्या योजना येतील त्या गोदावरीच्या कार्यक्षेत्रात बायफ संस्थेच्या माध्यमातून प्रामुख्याने राबविल्या जातील.नवनवीन संशोधनासाठी कोपरगांव तालुका उपयुक्त ठरेल.पशुचिकित्सकांना तसेच कृत्रिम रेतनतज्ज्ञांना नवनवीन व प्रगत असे प्रशिक्षण देण्यात येईल-डॉ.व्ही.बी.दयासा
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील दूध संघ व बायफ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या काळात कृत्रिम रेतनाचे उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल रेतन तज्ज्ञांचा पशुमित्र सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी बायफ संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे विभागीय संचालक व्ही.बी.दयासा,मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे,विभागीय अधिकारी डॉ.शब्बीर शेख, नाशिक बायफ कार्यालयाच्या अधिकारी श्रीमती नीधी परमार,राष्ट्रीय डेअरी
विकास बोर्डाचे कार्यक्रम समन्वयक डॉ.चंद्रकांत धंदर,कोपरगांव कार्यालयाचे विभागीय अधिकारी डॉ.बाळासाहेब जिगलेकर,कोपरगांव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.दिलीपराव दहे,कोपरगांव पशु चिकित्सालयाच्या पशुधन विकास अधिकारी डॉ.श्रध्दा काटे,सुधाकर बाबर,डॉ.वासिम हन्नुरे,विशाल खैरे,संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील ३४ केंद्रांमार्फत यावर्षी एप्रिल ते ऑगष्ट या कालावधीत रेतनतज्ज्ञांनी सुमारे २१ हजार ६८० कृत्रिम रेतन केलेले आहे. सॉर्टेड सिमेनचे मागील वर्षी ३२६ रेतन केलेले होते ते यावर्षी ५१५ पर्यंत झाले आहे.यंदाच्या कोरोना महामारीच्या कालावधीतील हा मोठा उच्चांक आहे. रेतनतज्ज्ञांनी स्वत:ची व कुटुंबांची काळजी न करता दूध उत्पादकांसाठी अहोरात्र आणि अविरतपणे केलेली सेवा निश्चितच गौरवास्पद असल्याचे सांगून श्री परजणे यांनी त्यांच्या कामाचे कौतूक केले.देशात सॉर्टेड सिमेनचा उपक्रम राबविण्याचा पहिला मान गोदावरी दूध संघाला मिळाला आहे. त्याचा दूध उत्पादन व पशुधन वाढीसाठी लाभ झालेला आहे.लवकरच मोबाईल व्हॅन उपक्रमाद्वारे प्रत्येक गांवात व वाड्या-वस्त्यांवर जाऊन जनावरांची चिकित्सा व औषधोपचार करण्याचा संघाचा विचार आहे.तसेच दूध उत्पादकांना मार्गदर्शक ठरेल असे मासिक सुरु करण्याचाही आपला मानस असल्याचे श्री परजणे यांनी शेवटी सांगितले आहे.
यावेळी मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे यांनीही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात कृत्रिम रेतनाचा सर्वाधिक लाभ घेणारे पशुपालक पांडुरग माळी,बबन गाडेकर,कचरु बोरनारे,अजित कोताडे,संतोष वाबळे,गायत्री परजणे यांचा तर जास्तीत जास्त रेतन करणारे रेतनतज्ज्ञ बाळासाहेब कोल्हे,नवनाथ कवडे, भाऊसाहेब जाधव,नामदेव गवारे,सुनील होन,जालिंदर साबळे,दिलीप शेळके,प्रसाद आसने यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच कृत्रिम रेतनाच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल कृष्णा शेंडगे,बबन जाधव,सूर्यभान भवर,अमोल मुटकुळे,दादासाहेब टेके,सूर्यभान आसने,संभाजी कातोरे,गणेश धनवटे, राजेंद्र देशमुख,मनोज वाकोडे,गणेश गायकवाड,गौरव जाधव,सागर दाभाडे,विनायक थोरात,राजेंद्र पवार,विशाल खुटे,राहूल घोरपडे,राजेंद्र चांदगुडे,लक्ष्मण कोळपे,सौरभ भदे,अक्षय आबक,किशारे पुणे,सागर बागूल,उमेर शेख,हारुन शेख,सतिश मोकळ यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.
Leave a Reply