Globe’s most trusted news site
नगर-मनमाड या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला असून या राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी रूपये तर मजबुतीकरण व नूतनीकरणासाठी भरीव निधी देणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण यांनी आ.आशुतोष काळे यांना नुकतेच दिले आहे.
अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर पुणतांबा फाटा चौफुली व साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे सातत्याने मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते.तसेच याठिकाणी शाळा-महाविद्यालये, औद्योगिक वसाहत, रेल्वे स्थानक रोड,कारखाना परिसर व कोपरगाव शहरात प्रवेश करण्यासाठी महत्वाचा मार्ग असल्यामुळे या ठिकाणी होत असलेल्या वाहन कोंडीमुळे अनेक पादचाऱ्यांना व दुचाकी स्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे.त्यामुळे या राज्यमार्गाची दुरुस्ती करतांना पुणतांबा फाटा चौफुली येथे उड्डाणपूल करण्यात यावा-आ.काळेनगर-मनमाड हा मार्ग पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला असून या मार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून कोरोना उपचारासाठी नेत असताना सुमारे सहा बाधितांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना कोरोना आढावा बैठकीत नुकतीच उघड झाली होती.त्या नंतर या मार्गासाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नुकतीच बैठक घेतली होती.मात्र त्या साठी तरतूद होऊ शकली नाही त्यामुळे या मार्गासाठी त्यांनी आपला मोर्चा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचेकडे वळवला होता त्याची बैठक नुकतीच मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनात संपन्न झाली त्यावेळी हे आश्वासन त्यांनी दिले आहे.या बैठकीत आ.काळे यांनी अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाची झालेली दुरावस्था व तातडीने दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपुढे मांडून रस्त्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली.कोपरगाव तालुक्याच्या शेजारी साईबाबा यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी धार्मिक स्थळ आहे. शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर वाहनांची संख्या जास्त आहे.रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाण्यास विलंब होत असून अनेक गंभीर रुग्णांनी रस्त्यातच आपले प्राण सोडले असल्याचे आ.काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चव्हाण यांना सांगितले.तसेच बेट नाका,श्री.संत जनार्दन स्वामी आश्रम येथे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात यावा.येवला नाका व श्री साईबाबा कॉर्नर येथील वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या आणि सदर मार्गावर गरजेच्या ठिकाणी सेवा मार्ग काढण्यात यावा अशी मागणी आ.काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्याबाबत आपण लवकरच निर्णय घेवू असे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितले असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.
.
Amdar ashutosh Kale Janshakti News kopargaon kopargaon news Travel
WhatsApp us
Leave a Reply