जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांना येत असलेल्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने बैठक घेवून व्यापाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.
कोपरगाव नगरपरिषदेने व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे.कै.बाबू भिलाजी वाणी व्यापारी संकुलातील ज्या व्यापाऱ्यांनी लिलाव खरेदी केली आहे पण करार केले नाही त्यांचे करार करून घ्यावे. या व्यापाऱ्यांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने बैठक घ्यावी-आ.काळे
कोपरगाव शहरातील विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची सोमवार (दि.२१) रोजी साईबाबा तपोभूमी कोपरगाव बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे,सुनील शिलेदार, दिनार कुदळे,गाळाधारक वसीम शेख,प्रकाश चांदगुडे, हृषीकेश खैरनार, राहुल मुळे, दिलीप गंगवाल, निखिल गंगवाल, अन्सार शेख, दादाभाऊ गंगूले, झीशान अत्तार, अभय दुबे,नगरपरिषद बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, लिपिक राजू गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,”कोपरगाव नगरपरिषदेने व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे.कै.बाबू भिलाजी वाणी व्यापारी संकुलातील ज्या व्यापाऱ्यांनी लिलाव खरेदी केली आहे पण करार केले नाही त्यांचे करार करून घ्यावे. या व्यापाऱ्यांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने बैठक घ्यावी व हे प्रश्न मार्गी लावावे. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करा,साठवण तलाव क्रमांक ५ व वाढीव पाईपलाईनचे अंदाजपत्रक तयार करा,नदी संवर्धन,खंदकनाला सुशोभीकरण व दोन्ही स्मशानभूमी नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करावा.शुक्लेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग निधी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचनाही यावेळी आ. काळे यांनी या बैठकीत केली आहे.