जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील शिंदे-शिंगीनगर येथील सर्व्हे क्रमांक १९९ मधील पाण्याच्या टाकीस थोर महिला क्रांतिकारक सावीत्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका दीपा वैभव गिरमे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
नवीन लोकवस्तीस पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने नवीन पाण्याची विस्तारीकरण योजना राबवून या नागरिकांची सोय केली आहे.नगरपरिषदेने नव्याने बांधलेल्या या पाण्याची टाकीस आद्य शिक्षिका व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला-खांदा लावून महिला शिक्षणाचे मोलाचे काम करणाऱ्या आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचे स्मरण या निमित्ताने होई-दीपा गिरमे
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत शिंदे-शिंगीनगर या परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे या नवीन लोकवस्तीस पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने नवीन पाण्याची विस्तारीकरण योजना राबवून या नागरिकांची सोय केली आहे.नगरपरिषदेने नव्याने बांधलेल्या या पाण्याची टाकीस आद्य शिक्षिका व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला-खांदा लावून महिला शिक्षणाचे मोलाचे काम करणाऱ्या आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचे स्मरण या निमित्ताने होईल व तीच खरी त्यांना आदरांजली ठरेल अशी अपेक्षा या भागाच्या नगरसेविका दीपा गिरमे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.
Leave a Reply