जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोना विषाणूची साथ अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या साठी कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून गत दोन दिवसात पोलीस निरीक्षक राकेश मानागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला काल दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या २०१ अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ४८६ झाली आहे तर २६ रुग्णांचे निधन झाल्याने शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यात कोपरगाव शहरातील ३२ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील २१ जण असे ५३ रुग्ण बाधित निघाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला काल दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या २०१ अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ४८६ झाली आहे तर २६ रुग्णांचे निधन झाल्याने शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यात कोपरगाव शहरातील ३२ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील २१ जण असे ५३ रुग्ण बाधित निघाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.शहरात आता कोविड केंद्र कमी पडू लागले आहे.दुसरे कोविड केंद्र सुरु करावे लागले आहे.तर आ.आशुतोष काळे यांनीं आता वाढीव रुग्ण उपचारासाठी जागा कमी पडत असल्याने शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मिनतवाऱ्या करण्यास प्रारंभ केला आहे.नागरिकांचा असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.उक्कडगावात तर डझनावारी रुग्ण वाढत चालले आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुन्हा एकदा कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई काल दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान केलेल्या कारवाईत शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी अम्मार निसार शेख वय-१९ रा.संजयनगर,कोपरगाव,अनजर मुक्तार शेख वय-२३ रा.गांधीनगर,सिद्धार्थ प्रकाश जगताप वय-२३, रा.टाकली नाका,मंगेश राजेंद्र रुईकर वय-३६ रा.खडकी,निलेश राजेंद्र रुईकर वय-३८ रा खडकी,संजय वसंतराव होले,वय-४० रा.टाकळी नाका,इरफान सलीम खान वय-२४ रा.गांधीनगर ,लाला जैनुद्दीन शेख वय-४९,रा.गांधी चौक,आशपाक फारुख खाटीक वय-२८ रा.गांधीनगर,आवेश कादिर खाटीक वय-१९,पवन संतोष खिची वय-२६,रा.बाईल बाजार रोड,अभिषेक किशोर खरात वय-२० रा.धारणगाव रोड,किरण दिलीप व्यवहारे वय-२६,रा.गांधीनगर,निखिल प्रभू कराचिवाला वय-२५ रा.राममंदिर रोड सर्व कोपरगाव आदीं चौदा जणांवर बैल बाजार रोडवर दि.गुरुवार दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ०१ वाजेच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे.व त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गादीवर फोनवर बोलणे,शासनाने दिलेले आदेश न पाळणे आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी अंबादास रामनाथ वाघ या पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.७०४/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे करीत आहेत.
Leave a Reply