जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतीनिधी)
कोपरगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मात्र गत आठ दिवसापासून टाळेबंदी जाहीर करून त्याची सक्तीची अंमलबजावणी करून घेतल्याने व त्याला सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमुखाने साथ दिल्याने या हद्दीत रुग्णवाढ रोखली गेल्याची माहिती गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राकेश परजणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ सुरु झाली होती मात्र जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे व गावातील जेष्ठ नागरिकांनी ग्रामसभा बोलावून या बाबत तातडीने निर्णय घेऊन गावात अत्यावश्यक सेवा वगळता टाळे बंदी करण्याचा निर्णय घेऊन योग्य दिशेने पाऊल टाकल्याचे आज आठवडाभराने सिद्ध झाले आहे.गत आठवडा भरात गावात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही हे विशेष !
नगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३३ हजार ८९० वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ५४२ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक वसुली विभागातील महिला अधिकारी व एक महिला तर एक पुरुष कर्मचाऱ्यांनाही लागण झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.तर आज दोघांचे निधन झाले आहे.आज ५३ बाधित रुग्णांची वाढ झाल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ सुरु झाली होती मात्र जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे व गावातील जेष्ठ नागरिकांनी ग्रामसभा बोलावून या बाबत तातडीने निर्णय घेऊन गावात अत्यावश्यक सेवा वगळता टाळे बंदी करण्याचा निर्णय घेऊन योग्य दिशेने पाऊल टाकल्याचे आज आठवडाभराने सिद्ध झाले आहे.गत आठवडा भरात गावात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही हे विशेष ! त्यामुळे परजने यांचेसह ग्रामस्थांचा विश्वास दुणावला आहे.दरम्यान गावात माझे कुटुंब-माझी जबाबदारी या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत गावात लक्ष्मणवाडी,रामवाडी,मनाई वस्ती दशरथवाडी आदी ठिकाणी चार आरोग्य पथकांमार्फत सुमारे २०० ते २५० कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.नागरिकांना आरोग्य प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे महत्व समजावून सांगून तोंडाला मुखपट्या बांधणे व प्रतिबंधात्मक औषधे हात धुण्यासाठी वापरण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.त्याला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री खोत यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नियुक्त करण्यात आली असून ते आपले काम करीत आहेत.जनतेने विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन उपसरपंच विवेक परजने यांनी शेवटी केले आहे.
Leave a Reply