जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथील एकतीस वर्षीय रहिवाशी महिलेचा नजीकचा आरोपी अनिल मच्छीन्द्र सोळसे याने महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने दहिगाव बोलका परिसरात खळबळ उडाली आहे.
दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत शिवाजीनगर येथील रहिवाशी असून आपल्या अन्य कुटूंबातील सदस्या सोबत रहाते. ती आपल्या घरात एकटीच असल्याचे हेरून नजीकचा आरोपी अनिल सोळसे हा तिच्या घरात दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आला व त्याने महिलेचा डावा हात पकडून त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.
सदर चे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत शिवाजीनगर येथील रहिवाशी असून आपल्या अन्य कुटूंबातील सदस्या सोबत रहाते. ती आपल्या घरात एकटीच असल्याचे हेरून नजीकचा आरोपी अनिल सोळसे हा तिच्या घरात दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आला व त्याने महिलेचा डावा हात पकडून त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचे या महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपी अनिल सोळसे याचे विरुद्ध गु.र.नं.४६७/२०२० भा.द.वि.कलम ३५३ व ४५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.या घटनेने दहिगाव बोलका परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
Leave a Reply