जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्र सरकारने कांदा निर्यातीला अचानक थांबविण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान सुरु ठेवल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी कोपरगाव शहर शिवसेनेने कोपरगाव येथील तहसीलदार योगेश चंद्रे यांना थेट कांद्याची गोणी भेट देऊन अनोखे आंदोलन करून गांधीगिरी केली आहे.सेनेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे
दुस्थानच्या कांद्याला विदेशातून चांगली मागणी आहे कांद्याची निर्यात खात्रीशीरपणे करणारा देश अशी प्रतिमा आहे.मात्र केंद्र सरकारने अचानकपणे निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे हिंदुस्थानच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.सध्या जगभरात सुरू असलेली कोविड-१९ या साथीची व त्याच बरोबर गत दोन वर्षांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवलेली असताना त्यातच केंद्र सरकारने सोमवारी अचानक सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा दुर्दैवी निर्णय घेतला तो त्वरित बदलावा-कलविंदर दडियाल,शहाराध्यक्ष
देशभरात सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने कांदा पिकवला असून त्याला भाव मिळण्याच्या स्थितीत केंद्र सरकारने ऐन वेळी निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना दगा देण्याचे काम सुरु केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.शेतकऱ्यांना एकीकडे आम्ही मुक्त बाजार पेठ उपलब्ध करून दिली म्हणून कौतुक सोहळे करायचे तर दुसरीकडे कायद्यात पळवाट ठेऊन त्याना दाम मिळण्याच्या स्थितीत त्याना बोळात गाठविण्याचे रणनीती भाजप सरकार अवलंबत असून हे पुतना मावशीचे प्रेम उघड झाले आहे.त्यामुळे आता भाजपने शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारण्याचा अधिकार गमावला आहे.वर्तमान स्थितीत इराण,अफगाणिस्थानआफ्रिकन देशात कांद्याला चांगली मागणी असताना शेतकऱ्यांना दोन पैसे मिळविण्याच्या वेळेत हा उद्योग केंद्र सरकारने करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे पातक करू नये असे आवाहनही सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी केले आहे.
तर शहराध्यक्ष कलविंदर दडियाल या वेळी बोलताना म्हणाले की.”हिंदुस्थानच्या कांद्याला विदेशातून चांगली मागणी आहे कांद्याची निर्यात खात्रीशीरपणे करणारा देश अशी प्रतिमा आहे.मात्र केंद्र सरकारने अचानकपणे निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे हिंदुस्थानच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.सध्या जगभरात सुरू असलेली कोविड-१९ या साथीची व त्याच बरोबर गत दोन वर्षांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवलेली असताना त्यातच केंद्र सरकारने सोमवारी अचानक सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला.त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.सदर निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा व कांदा निर्यात बंदी करण्याचा कांदा उत्पादकांवर लादलेला निर्णय त्वरित रद्द करून पुन्हा निर्यात चालू करावी अशी मागणीही दडियाल यांनी शेवटी निवेदनात केली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,उपजिल्हाप्रमुख (ग्रामीण) प्रमोद लबडे,एस.टी.कामगार सेना प्रमुख भरत मोरे,विधानसभा संघटक अस्लम शेख, युवासेना सहसचिव व विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील तिवारी,उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, विक्रांत झावरे,विभागप्रमुख विकास शर्मा,शहर संघटक बाळासाहेब साळुंके,इरफान शेख,व्यापारी सेनेचे योगेश मोरे,विशाल झावरे,वैभव लोणारी,अनिकेत कुऱ्हे,अक्षय नन्नवरे,अक्षय वाकचौरे,भूषण पाटणकर,मयुर खरनार,आकाश कानडे,वाल्मीक चिने,विजय सोनवणे,गगन हाडा,वासिम शेख,श्रीपाद भसाळे,मयुर शिवदे,सनी डहांके,विजय शिंदे,भूषण वडांगळे,प्रवीण देशमुख आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Leave a Reply