जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराची पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे आणि नगरपरिषदेच्या मालकीच्या पाच क्रमांकाच्या तलावाचे काम अग्रक्रमाने घेतल्याने अनेकांची दुकाने बंद पडण्याचा धोका आगामी कालखंडात दिसत असल्यानेच अनेकांना पोटशूळ उठला असून त्यांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बहिरेपणाचे सोंग घेऊन आरोप-प्रत्यारोपाची राळ उठविण्याचे षडयंत्र आखून त्याची अंमलबजावणी केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक व जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी कोल्हे गटा विरोधात एका कार्यक्रमात नुकताच केला आहे.
कोल्हे गटानेच निसर्ग कॅन्सल्टंसीला या आधी बीले प्रदान करून नंतर राजेंद्र सोनवणे व अतुल काले यांनीच दि.७ मे २०१६ रोजी सभेत विरोध केला व निसर्ग कन्सल्टंसी काढून टाकण्याचा ठराव केला आहे.आता ती कन्सल्टन्सी उच्च न्यायालयात गेली व त्यांनी ३७.५० लाखांची रक्कम आता १ ते १.५० कोटी मागण्यास सुरुवात केली आहे. तर याला जबाबदार आम्ही कसे ? -संदीप वर्पे
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि.१५ सप्टेंबर रोजी वेब पोर्टलच्या सहाय्याने मोठ्या उत्साहात पार पडली आहे.मात्र या बैठकीत कोल्हे गटाने आपल्याला पालिका अधिकाऱ्यांचा आवाजच येत नसल्याचा आरोप करून हि बैठक आगामी कालखंडात आठ दिवसांनी घ्यावी अशी मागणी केली होती या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-शिवसेना व अपक्ष नगरसेवक यांची संयुक्त पत्रकार परिषद आज गौतम बँकेच्या सभागृहात आज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास पार पडली आहे त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे कोपरगाव नगरपरिषद गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,सपना मोरे,प्रतिभा शिलेदार,माधवी वाकचौरे,वर्षा शिंगाडे,वर्षा कहार,शेख सईदाबी,आदींसह माजी नगरसेवक रमेश गवळी,राजेंद्र वाकचौरे,फकीर कुरेशी,आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,कोपरगाव नगरपरिषदेची बैठक कोणी बोलावली व ती कधी बोलावली यातील अंतर पाहिले व सरकारने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बोलावलेली हि बैठक असल्याने आघाडी सरकारमधील घटक पक्ष शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच आदेश काढून या बैठका ऑनलाइन घ्याव्या असे आदेश दिले असताना शिवसेनेचे काही नगरसेवक कोल्हे गटाला सामील होऊन या देशाला विरोध करत आहेत हि बाब धक्कादायक असल्याचे सांगून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी पाच क्रमांकाच्या तलावाचे काम गतवर्षी निवडून आल्या-आल्या हाती घेतले आहे.तरी काही विघ्नसंतोषी लोक याला आपल्या सवयीप्रमाणे विरोध करत आहे.वास्तविक यांचे बोलविले धनी वेगळेच असून यांनी शहराला कायम तहानलेले ठेवण्याचे षडयंत्र आखले आहे.त्यातील हा एक भाग असल्याचे सांगून याच लोकांनी गायत्री कंपनीने या तलावाची माती नेऊ नये यासाठी किती प्रयत्न केले,कसे केले यांचा या महामार्गात सहभाग आदी माहिती सर्व नगरवासियांना आहे.यांनीच निसर्ग कॅन्सल्टंसीला या आधी बीले प्रदान करून नंतर राजेंद्र सोनवणे व अतुल काले यांनीच दि.७ मे २०१६ रोजी सभेत विरोध केला व निसर्ग कन्सल्टंसी काढून टाकण्याचा ठराव केला आहे.
सुरुवातीला ४२ कोटींची पाणी योजना केवळ ३८ कोटींची होती ती पुढे १० टक्के वाढीव दराने कोणी मंजूर केली व ४२ कोटींवर कोणी नेली.व आता ती ४९ कोटींवर कशी गेली असा सवाल त्यांनी केला आहे.यांनीच २०१५ साली नांदूरमध्यमेश्वर मधून बंदिस्त जलवाहिनी आणण्याचे अंदाजपत्रक मानव सेवा कन्सल्टंसीने बनविले तेव्हा ती चांगली व आता पाच क्रमांकाचे बनवले तर वाईट हे यांचे नेमके काय चालले आहे. व याच लोकांनी नंतर विरोध सुरु केला होता.४२ कोटीच्या पाणी योजनेच्या कंपनीची १८ कोटींचे बिले यांच्याकडे सत्ता असताना काढली तर ते योग्य आणि सत्ता बदल झाला आणि ०८ कोटींची बिले काढले तर अयोग्य हा कुठला न्याय ?-विरेन बोरावके गटनेते
आता ती कन्सल्टन्सी उच्च न्यायालयात गेली व त्यांनी ३७.५० लाखांची रक्कम आता १ ते १.५० कोटी मागण्यास सुरुवात केली आहे. तर याला जबाबदार आम्ही कसे ? असे म्हणून त्यांचेच दात त्यांच्या घशात घातले आहे.तीच बाब त्यांनी तलावाचे काम करणाऱ्या एजन्सीला लागू करून त्यांचे हात ओले होत होते तोपर्यंत बिले दिली गेली व नंतरच सत्ता बदल होताच विरोध सुरु केला हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही.सुरुवातीला ४२ कोटींची पाणी योजना केवळ ३८ कोटींची होती ती पुढे १० टक्के वाढीव दराने कोणी मंजूर केली व ४२ कोटींवर कोणी नेली.व आता ती ४९ कोटींवर कशी गेली असा सवाल त्यांनी केला आहे.यांनीच २०१५ साली नांदूरमध्यमेश्वर मधून बंदिस्त जलवाहिनी आणण्याचे अंदाजपत्रक मानव सेवा कन्सल्टंसीने बनविले तेव्हा ती चांगली व आता पाच क्रमांकाचे बनवले तर वाईट हे यांचे नेमके काय चालले आहे. व याच लोकांनी नंतर विरोध सुरु केला होता.४२ कोटीच्या पाणी योजनेच्या कंपनीची १८ कोटींचे बिले यांच्याकडे सत्ता असताना काढली तर ते योग्य आणि सत्ता बदल झाला आणि ०८ कोटींची बिले काढले तर अयोग्य हा कुठला न्याय ? असा तिखट सवाल केला आहे.आरक्षण मुद्द्यावरही त्यांनी अशाच पद्धतीने घेरून कोल्हे गटाच्या शिडातील हवाच काढुन घेतली आहे.यानीं आता तिसऱ्या पक्षाने ऑडिट करण्याची मागणी केली त्याला उतर देताना त्यांनी ते कधीच झाला असून कोल्हे गटाच्या नगरसेवकांना ते माहिती नाही हे गुण त्यांचे ते अज्ञान प्रकट करत असल्याचे सांगून कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पाच क्रमांकाच्या तलावाला विरोध करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये व जनहिताचे विचार करावा असे आवाहन केले आहे.त्यामुळे कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी स्वतःचे हसे करून घेतल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
यावेळी गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक मेहमूद सय्यद,नगरसेविका सपना मोरे,यांनीही आपली भूमिका मांडली असून कोल्हे गटाच्या नगरसेवकांवर कठोर टीका केली आहे.
Leave a Reply