जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील साई संस्थानचे मुख्य कार्यकारी कार्यकारी हे संस्थानचा कारभार चालविण्यास आडकाठी आणत असल्याची गोपनीय तक्रार नगर येथील जिल्हा प्रधान न्यायमूर्ती यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे केल्याने त्या बाबत खुलासा करण्यासाठी उच्च न्यायालयाने त्यानां येत्या २३ सप्टेंबर रोजी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना हाजीर हो..! चे आदेश बजावल्याने या आदेशाने अधिकाऱ्यांमार्फत संस्थानच्या कारभारात हस्तक्षेप करणाऱ्या राजकीय नेत्यांना चाप बसल्याचे मानले जात आहे.
साईबाबा संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तदर्थ समितीच्या इतर सदस्यांना न विचारता व उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी न घेता धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेऊन गैरव्यवहार केल्याबद्दलचे गंभीर प्रकरण समोर असताना प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांनी वर्तमान मुख्य कार्यकारी अधिकारी हे हि काम करताना अडथळा निर्माण करत असल्याची बाब उच्च न्यायालयांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांनी सादर केलेल्या या बाबी नुसार हा आदेश मुख्य कार्यकारी कान्हूराज बगाटे यांना पारित केला असल्याची माहिती अड्.अजिंक्य काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,शिर्डी येथील माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयाने नवीन विश्वस्त शासनामार्फत नियुक्त करेपर्यंत नगर येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त विभागीय आयुक्त,नासिक व सह धर्मादाय आयुक्त,अहमदनगर यांची तदर्थ समिती गठित करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार ०९ ऑक्टोबर २०१९ रोजी आदेश दिले होते.सदर समिती ऑक्टोबर २०१९ पासून साईबाबा संस्थान चा कार्यभार सांभाळत असून उच्च न्यायालयाच्या परवानगीने धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेत आहे.दरम्यान साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तदर्थ समितीच्या इतर सदस्यांना न विचारता व उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी न घेता धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेऊन गैरव्यवहार केल्याबद्दलचा गंभीर अहवाल या पूर्वीच्या अधिकाऱ्या बाबत या पूर्वी उच्च न्यायालयात सादर केला आहे.उच्च न्यायालयाने प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी सादर केलेल्या अहवालानुसार साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तदर्थ समितीच्या इतर सदस्यांना न विचारता व उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी न घेता धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेऊन गैरव्यवहार केल्याबद्दलचे निरीक्षण नोंदवले आहे. या समितीच्या रचनेत व अधिकाराचे धोरण स्पष्ट केले होते.उच्च न्यायालयाने नगर येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश हे साईबाबा संस्थान ट्रस्ट च्या तदर्थ समितीचे अध्यक्ष असतील व साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदर समितीचे सचिव असतील असे स्पष्ट केले होते.
त्यानंतर तदर्थ समितीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आडकाठी निर्माण करत असून तदर्थ समितीचे कामकाज सुरळीत होऊ देत नसल्याचा अहवाल अध्यक्ष तथा नगर येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना उच्च न्यायालयात सादर केला होता. तर वर्तमान मुख्य कार्यकारी अधिकारीही जिल्हा मुख्य न्यायधीशांना काम करताना अडथळा निर्माण करत असल्याचा गोपनीय अहवाल उच्च न्यायालयासमोर आलेला आहे.त्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाचे आज दि. १५ सप्टेंबर रोजी न्या.एस.व्ही गंगापूरवाला व न्या.एस.डी.कुलकर्णी यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना २३ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश केले आहेत.त्यामुळे संस्थानचा गैरकारभार करणाराना एक प्रकारे चाप बसण्यास मदत होणार आहे.
Leave a Reply