जनशक्ती न्यूजसेवा
शिर्डी( प्रतिनिधी)
राहाता येथील ग्रामदैवत व परिसराचे प्रसिद्ध असे देवस्थान असलेले श्री वीरभद्र महाराज मंदिरात आज मंगळवारी पहाटे अज्ञात चोरांनी चोरी केली असून सुमारे ३ लाख ८७ हजार रु.किमंतीचे दागिने चोरी गेले आहे.यासंदर्भात राहाता पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्तमानात कोरोनामुळे राहाता येथील प्रसिद्ध असे श्री विरभद्र मंदिर दर्शनासाठी बंद आहे. याचा गैरफायदा घेत आज मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी पहाटे च्या दरम्यान दोन अज्ञात चोरांनी मंदिरात शिरून ही जबरी चोरी केली आहे.या ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराजांच्या दागिन्यांच्या चोरीमुळे राहता तालुक्यातील भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या श्री विरभद्र मंदिरातील चोरीमुळे राहाता शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या कोरोनामुळे राहाता येथील प्रसिद्ध असे श्री विरभद्र मंदिर दर्शनासाठी बंद आहे. तरीही ही आज मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी पहाटे च्या दरम्यान दोन अज्ञात चोरांनी मंदिरात शिरून ही जबरी चोरी केली आहे.या ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराजांच्या दागिन्यांच्या चोरीमुळे राहता तालुक्यातील भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात श्री वीरभद्र महाराज राहता चे अध्यक्ष सागर सदाफळ यांनी माहिती देताना सांगितले की, राहाता येथील भर वस्तीत व नगर-मनमाड रस्त्याच्या पश्चिम दिशेला पूर्वमुखी असे भव्य दिव्य श्री विरभद्र महाराजांचे मंदिर बांधलेले आहे.राहता व तालुक्यातील भाविकांचे व जिल्ह्यातील अनेक भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे .मात्र कोरोनामुळे येथे दर्शनाला ते बंद आहे.अशा परिस्थितीत आज मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी पहाटे च्या दरम्यान दोन अज्ञात चोरांनी श्री वीरभद्र महाराज मंदिरात प्रवेश करून एक जण प्रवेशद्वाराजवळ थांबला व एक जण विरभद्र महाराज मंदिरातील गाभाऱ्यात गेला व तेथील श्री वीरभद्र महाराजांच्या चांदीचा मुकुट व चांदीचा कासव तसेच इतर अनेक दागिने असा सुमारे ०३ लाख ८७ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे, ही जबरी चोरी मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये हे दोन अज्ञात चोर दिसून येत असून त्यांनी आपले चेहरे झाकलेले आहेत. या चोरीची माहिती सकाळी श्री वीरभद्र महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ व इतर विश्वस्तांना तसेच राहता शहर व तालुक्यातील श्री वीरभद्र महाराजांचे भक्तांना समजताच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी जमा झाली. तसेच शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश भोये हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी सदरील दोन अज्ञात चोरांचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरा तील फुटेज पाहून तसेच श्वान पथकाचे पाचारण करून माग काढण्यात आला. पुढील तपास पोलिस करत आहेत.यासंदर्भात अज्ञात चोरां विरोधात राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भोये अधिक तपास करीत आहेत. दरम्यान राहता तालुक्यात चोरीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
Leave a Reply