जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेची आज सकाळी अकरा वाजता तब्बल सहा महिन्यानंतर सर्वसाधारण सभा दृक-श्राव्य माध्यमाद्वारे वेबेक्स या पोर्टलद्वारे संपन्न होत असताना आज भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधान यांचा ऑनलाइन कामकाज चालविण्याचा आदेश डावलून आपल्याला या माध्यमाचा आवाजच येत नसल्याची बतावणी करून या बैठकीतून बाहेर जाऊन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हि सर्व साधारण सभा स्थगित करून पुन्हा मोकळ्या मैदानात सुरक्षित अंतर राखून हि बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली असताना आज राष्ट्रवादी व भाजप-शिवसेनेचे काही नगरसेवक मात्र या सभेच्या कामकाजात सहभाग घेताना आढळून आल्याने भाजप-सेनेतील दुही पुन्हा एकदा उघड झाली आहे.दरम्यान भाजपच्या नगरसेवकांनी आज पाच क्रमांकाच्या तलावाच्या विषयावरून नगरपरिषद आवाराचा आखाडा बनवून टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्याचे अधिवेशन थेट उपस्थितीत होत आहे.लोकसभेचे अधिवेशन थेट होत आहे तर नगर परिषदेचे अधिवेशन आमने-सामने का होऊ शकत नाही.आम्ही या आधीच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हि सर्व साधारण सभा पालिका परिसरात थेट आमने-सामने घेण्याची मागणी केली होती मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.आता आमची बहुमताने मागणी आहे की,हि बैठक स्थगित होऊन हि सभा पुन्हा घ्यावी-माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे
कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा या पूर्वी कोरोना साथीचा प्रारंभ होण्यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली होती.त्या नंतर हि सभा प्रथमच होत असल्याने या सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागून असताना आज मात्र नगरपरिषदेच्या आवारांत विरोधाभासी चित्र पाहावयास मिळाले आहे.केंद्र व राज्य शासनाचा कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढण्याच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून कामकाज करण्याचा आदेश व प्राधान्यक्रम असताना कोपरगाव नगरपरिषद हद्दीत मात्र नेमका उलटी भूमिका त्यांचा समर्थकांनी घेतल्याचे दिसून येत होते.विशेष म्हणजे कोपरगाव शहरातही मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहे.त्यावर हि अफलातून मागणी नागरिकांना कोड्यात टाकणारी ठरली आहे.आज ऑनलाइन संपन्न होणाऱ्या या सभेपुढे एकूण २६ विषय ठेवण्यात आले होते.त्यात पहिला विषय हा मागील इतिवृत्त वाचून कायम करणे हा नित्याचा पण महत्वाचा असून अन्य २ ते ५ हे विषय नगरपरिषद कर्मचारी यांच्याशी संबंधित होता.तर विषय क्रं. ६ विषय हा नगरपरिषद हद्दीतील भांडवली मूल्य आधारित पंचवार्षिक कर आकारणी करणे तसेच फेर आकारणी करण्याशी संबंधित असून विषय क्रं.७ हा नगर-मनमाड राज्य मार्गावरील पथ दिव्यांचे पोल बसविण्याशी संबधित होता.तर विषय क्रं.८ व ९ हा घंटा गाड्या खरेदी करणे.व येसगाव येथील तलावावर असलेल्या विद्युत पंपाची शेड बांधणेशी संबंधित होता.तर विषय क्रमांक १० हा मागणी प्रमाणे विविध प्रभागात जलवाहिन्या टाकणेशी संबंधित तर विषय क्रं.११ हा येसगाव साठवण तलाव क्रं.५ यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणेशी संबंधित होता तर विषय क्रमांक २३ हा आरक्षण बदलण्याचा विषय त्या खालोखाल महत्वाचा वाटत असल्याचे त्यांच्या चर्चेत दिसून आले आहे.आणि नेमका हाच कळीचा मुद्दा ठरला आहे.पाच क्रमांकाच्या तलावा ऐवजी निळवंडे धरणावरून पिण्याचे पाणी बंदिस्त जलवाहिणीद्वारे आणणे या साठी भाजपने गत पंचवार्षिक कालखंडात जीवाचे रान केले होते तर या उलट नव्याने गत वर्षी निवडून आलेले आ.आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे हे पाच क्रमांकाच्या तलावाचेच पाणी कोपरगाव साठी संयुक्तिक असल्याचा व वास्तवाशी नाते सांगणारा दावा करत शांतपणे पाठपुरावा सुरु ठेवला होता.
“सदरची बैठक योग्य पद्धतीने पार पडली आहे.व त्यात शिवसेनेच्या नगरसेविका सपना मोरे व वर्षा शिंगाडे यांनी ठराव मंजुरीस मदत केली असून आ.आशुतोष काळे यांनी पाच क्रमांकाच्या तलावाच्या विषयी जे काम योग्य रीतीने सुरु ठेवले आहे त्यास मंजुरी दिली आहे.हि बैठक होऊ नये व तहकूब करावी व ११ क्रमांकाचा जनतेच्या जिव्हाळ्याचा तलावाचा विषय मंजूर होऊ नये यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी खूप दबाव अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेवर आणला होता मात्र त्यास त्यांनी जुमानले नाही व सभा सरकारच्या नियमात काही विषयांचा अपवाद वगळता पार पाडली आहे-विरेन बोरावके, गटनेते राष्ट्रवादी
त्यांनी तलावाची खोदाई कुठल्याही धामधुमीशिवाय पूर्ण करून टाकली आहे.व आता या तलावासाठी आर्थिक तरतूद करण्याचा प्रयत्न सुरु आहे.त्यासाठी या बैठकीत विषय क्रमांक ११ हा या तलावाच्या बांधकामासाठी खाजगी तांत्रिक सल्लागार नेमणे हा विषय विषय पटलावर होता.मात्र भाजपच्या नगरसेवकांना आपल्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांकडून नेमक्या या विषयाला खोडा घालण्याचा आदेश असल्याने त्यांनी या विषयाला बगल देण्यासाठी कुभांड रचले असल्याचे उघडपणे दिसत होते.कारण यातील काही नगरसेवक आवाज येत नाही अशी सबब सांगताना मात्र ऑनलाइन मात्र अध्यक्षांशी मोठमोठ्याने संवाद साधतानाचे विरोधाभासी चित्र दिसत होते.व त्यांचा नीट सवांद होताना माध्यमांचे प्रतिनिधी,सामान्य नागरिक नगरपरिषद कर्मचारी यांना उघड-उघड दिसत होता.व भाजपचे माजी उपाध्यक्ष विजय वाजे,सेनेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल स्वप्नील निखाडे,सत्येन मुंदडा,रवींद्र पाठक,महिला नगरसेवक विद्या सोनवणे,भारती वायखिंडे,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई,सौ.काले आदी नगरसेवक हे संवाद साधून व तेथे बाहेर आलेले मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना गाठून हि सभा स्थगित करण्याची मागणी करताना दिसत होते.तर काही नगरसेवक या बैठकीत थेट सामील असल्याचे पडद्यावर दिसत होते.तर काहींनी घुमजाव केलेला दिसत होता.
दरम्यान याबाबत मच्या प्रतिनिधीने राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वर्पे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी निर्गमित केलेला दि.३ जुलैला शासन आदेश सांगितला असून त्यात महापालिका,नगरपालिका,नगरपंचायती यांना सर्व सभा या ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा आदेश असल्याचे स्पष्ट करून सर्वसाधारण सभेने २६ पैकी १८ व २१ विषय वगळता सर्व विषय मंजूर केले असल्याचे सांगितले आहे.व आयत्या वेळेत आलेल्या ५ विषयांना हिरवा कंदील दिला असल्याचे सांगितले आहे.
त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला असताना वाजे म्हणाले की,”राज्याचे अधिवेशन थेट उपस्थितीत होत आहे.लोकसभेचे अधिवेशन थेट होत आहे तर नगर परिषदेचे अधिवेशन आमने-सामने का होऊ शकत नाही.आम्ही या आधीच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हि सर्व साधारण सभा पालिका परिसरात थेट आमने-सामने घेण्याची मागणी केली होती मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.आता आमची बहुमताने मागणी आहे की,हि बैठक स्थगित होऊन हि सभा पुन्हा घ्यावी.मात्र त्याला मुख्याधिकारी प्रशांत सरोदे दाद देताना दिसत नव्हते त्यांनी हा सभेचा अधिकार अध्यक्ष यांचा असून आपण यात भूमिका घेऊ शकत नाही असा दावा करताना दिसत होते.त्यातून भाजपच्या नगरसेवकांची मोठी घालमेल होताना दिसत होती व ते भ्रमणध्वनी द्वारे व चलचित्रणाद्वारे अध्यक्ष वहाडणे याना हि सभा रद्द करा असा आक्रांद नगरपरिषद आवारात मोठमोठ्या आवाजात सामान्य नागरिकांना व अमोर असलेल्या तालुका पोलीस ठाण्यात जाईल अशा आवाजात मोठमोठ्याने कर्णकर्कश आवाजात बोलत होते.मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक मात्र “आम्हाला आवाज येतो तर तुम्हाला का येत नाही” असा जाबसाल करत होते.राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वर्पे त्याना ऑनलाइन वर येण्याचे आवाहन करताना चलचित्रणाद्वारे करत असताना दिसत होते.अखेर भाजप नगरसेवकांनी पुन्हा मुख्याधिकारी सरोदे यांना लेखी निवेदन देण्याचा निर्णय दीड वाजेच्या सुमारास घेतला होता.तर इकडे सर्व विषयावर सविस्तर चर्चा होत असताना पावणे तीनच्या सुमारासही हेच चित्र दिसून येत होते.त्यामुळे पालिकेची सभा हि आज भाजपच्या वर्तनाने पालिका परिसरात अवकाळी शिंमग्याचे स्वरूप आलेले दिसून आलेले दिसले आहे.तर काही नगरसेवकांना आमच्या प्रभागात अनेक विषय प्रलंबित असून कोरोना किती दिवस चालले याचा अंदाज नसल्याने तातडीने हे विषय मार्गी लागावे असे त्याना वाटत होते.
Leave a Reply